Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हिरड्यातून रक्त - सतत दात दुखतात? ५ प्रकारच्या भाज्या अजिबात खाऊ नका; दात होतील कमकुवत

हिरड्यातून रक्त - सतत दात दुखतात? ५ प्रकारच्या भाज्या अजिबात खाऊ नका; दात होतील कमकुवत

The 5 Worst Foods for Sensitive Teeth : दातांची समस्या असल्यास कोणत्या फळे आणि भाज्या खाऊ नये?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2024 05:27 PM2024-07-17T17:27:20+5:302024-07-17T17:28:37+5:30

The 5 Worst Foods for Sensitive Teeth : दातांची समस्या असल्यास कोणत्या फळे आणि भाज्या खाऊ नये?

The 5 Worst Foods for Sensitive Teeth | हिरड्यातून रक्त - सतत दात दुखतात? ५ प्रकारच्या भाज्या अजिबात खाऊ नका; दात होतील कमकुवत

हिरड्यातून रक्त - सतत दात दुखतात? ५ प्रकारच्या भाज्या अजिबात खाऊ नका; दात होतील कमकुवत

निरोगी दात म्हणजे आरोग्यही निरोगी राहते (Teeth Problems). पण दात किंवा ओरल हेल्थवरही बऱ्याचदा परिणाम होतो. योग्य आहाराचे सेवन न केल्यास ओरल हेल्थ बिघडू शकते (Health Tips). काही पदार्थ असेल देखील असतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर पण यामुळे दातांचे दुखणे वाढू शकते. या ४ प्रकारच्या भाज्यातील बियांमुळे दातात कीड किंवा इतर समस्या निर्माण होऊ शकतात.

जर आपल्याला पहिल्यापासूनच दातांच्या निगडीत समस्या असतील तर, वेळीच ४ प्रकारची फळे आणि भाज्या खाणं टाळा. दातांचे दुखणे वाढणार नाही(The 5 Worst Foods for Sensitive Teeth).

टोमॅटो

भाजी किंवा रस्साभाजीमध्ये टोमॅटो असेल तर, पदार्थाची चव वाढते. टोमॅटो खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण त्यातील बिया दातांसाठी हानिकारक ठरू शकतात. टोमॅटोमधील लहान बिया दातांमध्ये अडकतात. जे सहसा ब्रश केल्यानंतरही निघत नाहीत. जर आपल्याला दातांचा त्रास असेल तर, टोमॅटो खा पण त्याच्या बिया काढून खा.

दिवसाची सुरुवात ' हे ' ६ पदार्थ खाऊन चुकूनही करू नये; तब्येत बिघडेल, अपचन - गॅसेसचा होतो त्रास

डाळिंब

लालेलाल डाळिंब खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, सेलेनियम आणि झिंक हे पौष्टीक घटक मुबलक प्रमाणात आढळते. पण जर आपल्याला दातांच्या निगडीत समस्या असेल तर, डाळिंब खाणं टाळा. यामुळे दातांच्या निगडीत समस्या वाढू शकतात.

वांगी

वांगीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. पण वांग्यांमध्ये लहान बिया असतात. जे दातांमध्ये अडकतात. जर आपल्याला दातांच्या निगडीत समस्या असेल तर, वांगी खाणं टाळणे उत्तम ठरू शकते.

रोज खा ४ पैकी १ पदार्थ, चष्मा लागणार नाही-डोळ्यांचा नंबर वाढण्यापूर्वी व्हा जाग

पेरू

पेरू दातांसाठी उत्तम फळ आहे. पण पिकलेला पेरू खाल्ल्याने दातांचे विविध आजार होऊ शकतात. ज्यांना हिरड्यांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यांनी पिकलेला पेरू खाऊ नये. 

Web Title: The 5 Worst Foods for Sensitive Teeth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.