फिट राहण्याचा मंत्र हा आपल्या जीवनशैलीत (lifestyle) दडला आहे. हेल्दी आणि प्रॉडक्टिव्ह राहण्यासाठी स्वतःवर काम करणं गरजेचं आहे. शिवाय स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी. पण बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांना स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही. सोप्या टिप्सचा वापर करून आयुष्य जगायचं असेल तर, आपण ९ - १ या नियमाचा वापर करू शकता. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की ९-१ म्हणजे काय? या आकडेवारीवरून आपण आपली जीवनशैली कशी बदलू शकतो?
यासंदर्भात, हबिल्डचे सीईओ सौरभ बोथरा सांगतात, 'उत्तम आरोग्य हवे असेल तर, ९-१ हे नियम पाळायलाच हवे. अंकांकडे लक्ष देण्याऐवजी त्यातील चांगल्या सवयी अंगीकरायला हवे.' चला तर मग निरोगी आणि प्रॉडक्टिव्ह आयुष्य जगण्याचा ९-१ हा फॉर्मुला नक्की काय सांगतो? याचा दैनंदिन जीवनात वापर कसा करावा? पाहूयात(The 9-1 rule: Does it improve health and productivity).
निरोगी आणि प्रॉडक्टिव्ह आयुष्य जगण्याचा ९-१ हा फॉर्मुला बेस्ट
- ९ - दररोज किमान ९००० पावलं चाला.
- ८ - दररोज किमान ८ ग्लास पाणी प्या.
- ७ - दिवसभर काम करण्याची उर्जा मिळावी, यासह मूड फ्रेश राहावा यासाठी ७ तासांची झोप गरजेची.
हाडांना मिळणार बळकटी-दातही राहतील मजबूत, फक्त न चुकता खा कॅल्शियमयुक्त ५ पदार्थ, आरोग्यासाठी उत्तम
- ६ - स्ट्रेस कमी यासह फोकस वाढवण्यासाठी दररोज किमान ६ मिनिटं मेडीटेशनला बसा.
- ५ - जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स मिळविण्यासाठी, दररोज ५ प्रकारची फळे आणि भाज्या खा.
- ४ - सेन्सरी ऑर्गन्सला विश्रांती मिळावी यासाठी दिवसातून ४ वेळा ब्रेक घ्या.
- ३ - एनर्जी बुस्ट शिवाय आरोग्य सुदृढ राहण्यासाठी दररोज ३ मुख्य वेळी जेवण करा.
- २ - रात्रीचे जेवण आणि झोपण्याच्या वेळेत २ तासांचे अंतर ठेवा.
- १ - तुम्हाला आवडणारा शारीरिक व्यायाम निवडा आणि तो रोज करा.
१०० पाऊले चालली तरी दम लागतो? श्वास फुलतो, पाय दुखतात? खा ५ पदार्थ- वाढेल झटपट एनर्जी
आकडेवारी नसून सवयींवर लक्ष द्या
तज्ज्ञ सांगतात, ''काहीवेळा नियमांचे काटेकोरपणे पालन करणे प्रोत्साहन देण्याऐवजी तणावाचे कारण बनू शकते. उदाहरणार्थ, जर आपण ९ ते १ नियमांचे पालन करताना त्यातील एक टास्क पूर्ण करू शकलो नाही, तर अशावेळी आपल्या मनात नैराश्याची भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे निराश न होता, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या, आणि या नियमांना फॉलो करण्याचा प्रयत्न करा.