Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नियमित ३ खा पदार्थ; रोज खा, गंभीर आजारही राहतील दूर

डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नियमित ३ खा पदार्थ; रोज खा, गंभीर आजारही राहतील दूर

The Best Foods for Diabetes : या तांदळाला आयुर्वेदात उत्तम तांदूळ मानले जाते. हा तांदूळ २ प्रकृती दोषांसाठी उत्तम असतो आणि पचायलाही हलका असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 12:34 PM2023-04-15T12:34:08+5:302023-04-15T13:34:32+5:30

The Best Foods for Diabetes : या तांदळाला आयुर्वेदात उत्तम तांदूळ मानले जाते. हा तांदूळ २ प्रकृती दोषांसाठी उत्तम असतो आणि पचायलाही हलका असतो.

The Best Foods for Diabetes : 3 Best light foods to eat in diabetes everyday according to ayurveda | डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नियमित ३ खा पदार्थ; रोज खा, गंभीर आजारही राहतील दूर

डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी नियमित ३ खा पदार्थ; रोज खा, गंभीर आजारही राहतील दूर

डायबिटीस (Diabetes) हा एक क्रोनिक आणि लाईफस्टाईलशी निगडीत आहे. यात रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होते आणि वाढत जाते. अशा स्थितीत रुग्णांनी आपल्या खाण्यापिण्यावर लक्ष द्यायला हवं. हाच रक्तातील साखरेची पातळी कमी करण्याचा उत्तम उपाय आहे. डायबिटीस असल्यास आहारात अशा पदार्थांचा समावेश करायला हवा ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असेल. (Sugar Level Control Tips) असे पदार्थ खाल्ल्यानंतर साखरेची पातळी वाढू देत नाहीत. आयुर्वेदीक तज्ज्ञ वरलक्ष्मी यांच्यामते या आजारावर आयुर्वेदीक उपाय करता येऊ शकतात. ( 3 Best light foods to eat in diabetes everyday according to ayurveda)

आयुर्वेदात मधुमेहाला संतर्पण जनव्याधी असे म्हणतात. याचा अर्थ असा विकार होतो जो कोणत्याही पोषक तत्वांच्या अति प्रमाणामुळे होतो. त्याच्या उपचाराची पहिली पायरी म्हणजे स्किपिंग थेरपी, ज्यामुळे शरीर हलके होते. म्हणूनच 3 हलके पदार्थ खाऊन मधुमेहाचा उपचार सुरू करता येतो. (The Best Foods for Diabetes)

लाल तांदूळ

या तांदळाला आयुर्वेदात उत्तम तांदूळ मानले जाते. हा तांदूळ २ प्रकृती दोषांसाठी उत्तम असतो आणि पचायलाही हलका असतो. यात एंटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्व भरपूर असते. ज्यामुळे भूक नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

जवस

डायबिटीस असल्याच जवसाचे सेवनही उत्तम मानले जाते जवस पचायला हलका असतो. याचा ग्लायसेमिक इंडेक्सही कमी असतो आणि बराचवेळ पोट भरलेलं राहतं. यामुळे कोलेस्टेरॉल नैसर्गिकरित्या नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

मूग डाळ

डाळी वात वाढवतात असं मानलं जातं. पण हिरवी मूंग डाळ पचायला हलकी असते आणि रोज याचे सेवन केल्यास पचनाच्या संबंधित समस्या टाळता येतात याशिवाय ब्लड शुगरही नियंत्रणात राहते. 

Web Title: The Best Foods for Diabetes : 3 Best light foods to eat in diabetes everyday according to ayurveda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.