Join us   

तिशीतच हाडं ठणकायला लागली? २ पालेभाज्या खा; मिळेल कॅल्शियम भरपूर-हाडं होतील मजबूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2024 6:14 PM

The Best Foods to Eat That Contain Calcium : २ प्रकारच्या पालेभाज्या रोज खाल्ल्याने हाडांना कोणते फायदे मिळतात?

शरीरातील हाडांमुळे आपल्या शरीराची बॉडी पॉश्चर व्यवस्थित राहण्यास मदत मिळते (Calcium). त्यामुळे हाडांची मजबुती राखणं महत्वाचं आहे. तिशीनंतर हाडं ठिसूळ होतात (Health Tips). त्यामुळे तज्ज्ञ आहारात कॅल्शियमचा समावेश करण्याचा सल्ला देतात (Food). हाडांचे कार्य सांध्यांना आधार देणे, रक्त निर्माण करणे, कॅल्शियम, फॉस्फेट इत्यादी गोळा करणे आहे.

एनसीबीआयच्या अहवालानुसार, 'कॅल्शियम शरीरात सर्वाधिक आढळते. त्यातील ९९ टक्के हाडांमध्ये असते. वाढत्या वयात हाडं कमकुवत होतात. हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियम आवश्यक आहे आणि यासाठी आपण कॅल्शियम युक्त पदार्थ खायला हवे.' कॅल्शियम नक्की कोणत्या पदार्थात आढळते? पाहा(The Best Foods to Eat That Contain Calcium).

अक्षय कुमार उठल्यानंतर करतो १ 'खास' काम; पन्नाशीतही तंदुरुस्त राहायचं असेल तर..

दुग्धजन्य पदार्थ

आपल्याला दुग्धजन्य पदार्थ खाऊनही कॅल्शियम मिळू शकते. एक ग्लास दूध प्यायल्याने अंदाजे ३०० ग्रॅम कॅल्शियम मिळते. याशिवाय दही खाल्ल्याने कॅल्शियम तर मिळतेच पण संसर्गापासूनही बचाव होतो. चीज आणि दही हे देखील कॅल्शियमयुक्त पदार्थ आहेत.

वजन वाढतं म्हणून चपाती बंद केली? कणकेत घाला ३ गोष्टी; वजन वाढणारच नाही; उलट..

धान्य

विविध प्रकारच्या धान्यांमध्येही कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. कडधान्य, ओट्स आणि इतर धान्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीरातील कॅल्शियमची गरज पूर्ण होते. यासह कोलेस्ट्रॉलची पातळीही नियंत्रणात राहते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन के आणि फायबर देखील आढळतात. ज्यामुळे चयापचयक्रियाही बुस्ट होते.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या भाज्या खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता तर पूर्ण होतेच पण इतरही अनेक फायदे आहेत, म्हणूनच डॉक्टर नेहमी हिरव्या भाज्या जास्त प्रमाणात खाण्याचा सल्ला देतात. ब्रोकोली, मेथी, पालक इत्यादींचा आहारात समावेश करू शकता. हिरव्या पाले भाज्या खाल्ल्याने हाडं मजबूत आणि इतर आजारांचाही धोका कमी होऊ शकतो.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्न