Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सकाळी की रात्री नक्की दूध प्यावं कधी? रात्री दूध पिण्याचे फायदे किती? कोणी दूध पिणे टाळावे?

सकाळी की रात्री नक्की दूध प्यावं कधी? रात्री दूध पिण्याचे फायदे किती? कोणी दूध पिणे टाळावे?

The best time to drink milk to get maximum benefits रात्री दूध कोणी प्यावं कोणी टाळावं? ग्लासभर दूध पिण्याचे फायदे किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2023 06:34 PM2023-08-24T18:34:06+5:302023-08-24T18:35:55+5:30

The best time to drink milk to get maximum benefits रात्री दूध कोणी प्यावं कोणी टाळावं? ग्लासभर दूध पिण्याचे फायदे किती?

The best time to drink milk to get maximum benefits | सकाळी की रात्री नक्की दूध प्यावं कधी? रात्री दूध पिण्याचे फायदे किती? कोणी दूध पिणे टाळावे?

सकाळी की रात्री नक्की दूध प्यावं कधी? रात्री दूध पिण्याचे फायदे किती? कोणी दूध पिणे टाळावे?

दूध हे संपूर्ण आहार आहे. हे सर्वांनाच ठाऊक आहे. लहानपणापासूनच आपल्या सर्वाना दूध पिण्याची सवय लावण्यात आलेली असते. दूध पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आपली आई आजही दररोज एक ग्लास दूध प्यायला सांगते. कारण, नियमित एक ग्लास दूध प्यायल्याने शरीराला आवश्यक कॅल्शियमचा पुरवठा होतो. ज्यामुळे हाडे निरोगी राहतात. यासह यातील कार्बोहायड्रेट, प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन डी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

परंतु, दूध कधी प्यावं? रात्री दूध पिणे किती योग्य? रात्री दूध प्यायल्याने शरीरात कोणते बदल घडतात? यासंदर्भात, आहारतज्ज्ञ दिव्या गांधी यांनी ऑन्ली माय हेल्थ या वेबसाईटला रात्रीच्या वेळी दूध पिण्याचे फायद्यांबद्दल माहिती दिली आहे(The best time to drink milk to get maximum benefits).

रात्रीच्या वेळी दूध पिण्याचे फायदे

रात्री दूध प्यायल्याने झोप चांगली लागते

दुधामध्ये ट्रिप्टोफॅन असते. हे एक प्रकारचे अमीनो अॅसिड आहे, जे सेरोटोनिन आणि मेलाटोनिनचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. ज्यामुळे झोप रेगुलेट होते. झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध प्यावे. यामुळे आपल्याला आराम वाटेल, व लवकर झोप लागेल.

तेलकट पदार्थ खाल्ल्याने त्वचा ऑईली होते का? नक्की कोणते स्किनकेअर रुटीन फॉलो करावे? काय खावे?

शरीर हायड्रेटेड राहते

दूध हे एक हायड्रेटिंग ड्रिंक आहे. दूध प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. दुधाचे नियमित सेवन केल्याने शरीरात द्रवपदार्थाची उपस्थिती कायम राहते. शरीर हायड्रेट राहणं खूप गरजेचं आहे. यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते.

करवटे बदलते रहे सारी रात..? सायंकाळी ४ चुका टाळा, तरच रात्री लागेल शांत झोप

पोटाची समस्या होते दूर

ज्यांना रात्री जेवल्यानंतर गॅसेस, पोट फुगणे असे त्रास छळतात. त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध प्यावे. यात फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पोटाच्या निगडीत त्रास कमी होतो.

रात्री झोपण्यापूर्वी लावा गुलाब पाणी, चेहऱ्यावर येईल गुलाबी चमक - सकाळी चेहरा बघून म्हणाल..

रात्रीच्या वेळी कोणी दूध पिऊ नये

ज्या लोकांना लैक्टोज असहिष्णुतेसह दूध पचण्यास त्रास होतो, त्यांनी रात्री दूध पिणे टाळावे. ज्यांना डायबिटीज आहे, त्यांनी रात्रीच्या वेळी डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच दूध प्यावे. यासह ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांनी रात्रीच्या वेळी दूध पिऊ नये, कारण यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे वजन वाढू शकते.

Web Title: The best time to drink milk to get maximum benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.