भारतीय आहारात चपाती हा मुख्य आहार आहे. भारतात गव्हापासून तयार करण्यात आलेल्या चपात्या खाल्ल्या जातात. (Best Type of Roti to Lose Weight) जेव्हा वजन कमी करण्याची वेळ येते तेव्हा चपाती आणि भात यांसारखे कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ खाणं टाळतात. पण चपाती शिवाय भारतीय थाळी अपूर्ण आहे. (Fitness These Five Grain Flour Rotis are Best For Weight Loss)
जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर चपाती खाणं सोडण्याची काही गरज नाही. तुम्ही आहारात गव्हापासून तयार करण्यात आलेल्या चपात्याऐवजी इतर पिठांच्या चपात्यांचा समावेश करू शकता. वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारच्या चपात्यांचा आहारात समावेश करू शकता ते पाहूया. (The Best Type of Roti to Lose Weight)
१) ज्वारीचे पीठ
नेटमेडच्या रिपोर्टनुसार वजन कमी करण्यासाठी तुम्ही ज्वारीच्या पीठापासून तयार झालेल्या भाकऱ्याचे सेवन करू शकता. हे पीठ ग्लुटेन फ्री असते. यात प्रोटीन्स, कॅल्शियम आणि आयर्न यांसारखी पोषक तत्व असतात. ज्वारीच्या पीठापासून तयार केलेल्या चपात्या खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते याशिवाय ब्लड शुगर लेव्हलही नियंत्रणात राहते.
२) बाजरीचे पीठ
बाजरीच्या पीठात अनेक पोषक तत्व असतात. यात फायबर्सचे प्रमाणही भरपूर असते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहते. बाजरीच्या पीठाच्या चपात्या खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार बाजरी पचायला हलकी असते आणि यामुळे कोलेस्टेरॉल लेव्हल चांगली राहते. यामुळे ग्लायसेमिक इंडेक्सही कमी होतो आणि ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.
३) बेसनाचे पीठ
जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर बेसनाच्या पीठापासून बनवलेल्या मऊ चपात्या किंवा भाकऱ्या खाऊ शकता. यात प्रोटीन्स आणि फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय पचनक्रियाही चांगली राहते आणि एनिमियाची समस्या दूर होण्यास मदत होते.
ऐन तरूण्यात गुडघे-कंबर दुखतेय? हाडांना भरपूर कॅल्शियम देईल 'हा' सोपा उपाय, १५ दिवसांत अशक्तपणा दूर
४) ओट्सचे पीठ
ओट्समध्ये फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं. ओट्सच्या पीठापासून बनवलेली चपाती खाल्ल्यास वारंवार भूक लागत नाही. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि आजारांचा धोकाही कमी होतो.
पोट सुटण्याच्या भितीने भात कमी खाता? या पद्धतीने हवा तितका भात खा-१ किलोही वजन वाढणार नाही
५) नाचणीचे पीठ
वजन कमी करण्यासाठी तुम्ही नाचणीच्या पिठाचा आहारात समावेश करू शकता. यात फॅट्सचे प्रमाण कमी असते. याव्यतिरिक्त यात फायबर्स, प्रोटीन्स, कॅल्शियमचे प्रमाणही जास्त असते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते तुम्ही रोजचा नाश्ता, लंच आणि डिनरमध्ये नाचणीच्या भाकऱ्यांचा समावेश करू शकता.