जर तुम्ही स्वयंपाक केलात तर तुमच्या हातांवर नक्कीच कांदा, लसणाचा वास जाणवला असेल. जेव्हा तुम्ही कांदा, लसूण सोलून कापता तेव्हा त्यांचा रस बोटांना आणि नखांना लागतो, जो साबणाने धुतल्यानंतरही निघत नाही. या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी लोक विविध उपाय करतात. त्याच्या वासामुळे बरेच लोक ते सोलणं किंवा कापणं टाळतात. (How to remove onion garlic smell from hands) कांदा आणि लसणाचा वास हातातून जात नसेल तर काही सोपे उपाय करून तुम्ही ही समस्या टाळू शकता. (Kitchen Hacks To Get Rid Of Onion And Garlic From Your Hands)
१) मीठाचा वापर
जेव्हा जेव्हा तुमच्या हाताचा वास येईल तेव्हा हात धुण्यासाठी पाण्यात एक चमचा मीठ मिसळा आणि तळवे चांगले घासून घ्या. असे केल्याने तुमच्या हातातून लसूण आणि कांद्याचा वास निघून जाईल.
२) चमचा किंवा चाकूचा वापर
कांदे आणि लसूण चिरल्यानंतर, आपल्या हातातील वास काढण्यासाठी, सिंकमधील टॅप उघडा आणि कोणत्याही स्टेनलेस स्टीलच्या चमच्याने किंवा चाकूच्या काठाने आपले हात थंड पाण्याखाली घासून घ्या. असे केल्याने कांदा आणि लसूणमध्ये असलेले सल्फर धातूशी प्रक्रिया करेल आणि वास नाहीसा होईल.
2 मिनिटात स्वच्छ होईल धूळ लागलेला एक्झॉस्ट फॅन; सोप्या ट्रिक्स काम करतील सोपं
३) लिंबाचा रस
हातांचा कांद्याचा वास दूर करण्यासाठी तुम्ही लिंबाचाही वापर करू शकता. लिंबाच्या रसाचे काही थेंब तळ हातावर टाका आणि चोळा. काही वेळाने थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
४) एप्पल सायडर व्हिनेगर
जर तुमच्या स्वयंपाकघरात एप्पल सायडर व्हिनेगर असेल तर तुम्ही त्याचा वापर करून तुमच्या हातांचा कांदा आणि लसणाचा वास दूर करू शकता. ते कापल्यानंतर हात पाण्याने धुवा आणि कोरडे करा आणि तळहातावर एक चमचा व्हिनेगर चोळा आणि काही वेळाने हात पाण्याने धुवा.
४ सवयी सोडा, वाढलेले कोलेस्टेरॉल होईल झटपट कमी; रक्ताभिसरणही वाढेल
५) टूथपेस्टचा वापर
टूथपेस्ट प्रत्येक घरात असते. अशा स्थितीत तुमच्या हातातून येणारा कांदा आणि लसणाचा वास दूर करण्यासाठी तुम्ही टूथपेस्टचाही वापर करू शकता. टूथपेस्ट जेल बेस्ड नसावी. फ्लोराईड बेस टूथपेस्ट हातावर लावल्यास हाताचा वास लगेच निघून जाईल.