Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उपवास करताना तुम्हीही करताच ' या ' ५ चुका, तब्येत सुधारण्याऐवजी बिघडेल - पडाल आजारी...

उपवास करताना तुम्हीही करताच ' या ' ५ चुका, तब्येत सुधारण्याऐवजी बिघडेल - पडाल आजारी...

Fasting Rules & Food What To Eat & What Not To Eat : The five common mistakes people make when fasting : उपवास करताना अशा चुका करु नका ज्याने शरीराला हानी पोहोचेल, या चुका नेमक्या कोणत्या ते पाहूयात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2024 06:46 PM2024-08-06T18:46:27+5:302024-08-06T18:56:05+5:30

Fasting Rules & Food What To Eat & What Not To Eat : The five common mistakes people make when fasting : उपवास करताना अशा चुका करु नका ज्याने शरीराला हानी पोहोचेल, या चुका नेमक्या कोणत्या ते पाहूयात...

The five common mistakes people make when fasting Fasting Rules & Food What To Eat & What Not To Eat | उपवास करताना तुम्हीही करताच ' या ' ५ चुका, तब्येत सुधारण्याऐवजी बिघडेल - पडाल आजारी...

उपवास करताना तुम्हीही करताच ' या ' ५ चुका, तब्येत सुधारण्याऐवजी बिघडेल - पडाल आजारी...

श्रावण महिन्याची सुरुवात झाली आहे. श्रावण महिना म्हटलं की आता वेगवेगळ्या सणांची रेलचेल सुरु असणार. या दरम्यान येणाऱ्या सणावाराला आपल्यापैकी बरेचजण उपवास करतात. बरेचजण श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवार आणि शनिवार या दोन दिवशी उपवास करताच. उपवास असला की आपण काही मोजकेच पदार्थ खातो. उपवास करण्याचे काही फायदे तोटे देखील आहेत. तज्ज्ञांच्या मते, उपवास केल्याने आपले शरीर डिटॉक्स होते. काही दिवस कमी खाल्ल्याने किंवा सात्विक अन्नपदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात यामुळे शरीर आतून स्वच्छ होते. उपवास केल्याने रक्तातील साखरेची पातळी, उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या समस्यांचा धोका कमी होतो. उपवास करण्याचे अनेक फायदे असले तरीही उपवास करताना शरीराची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. वेळीच योग्य ती काळजी न घेतल्यांस शरीरावर याचे वाईट परिणाम दिसू लागतात(Fasting Rules & Food What To Eat & What Not To Eat).

उपवासा दरम्यान आपण निष्काळजीपणा केल्यास आपली प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडू शकते. उपवासा दरम्यान नेमकी आहाराची आणि आरोग्याची कोणती काळजी घ्यावी हे आपल्याला माहित नसते. त्यामुळे आपण काही लहान - सहान चुका करतो, ज्याने आपली तब्येत बिघडू शकते. असे होऊ नये म्हणूंन श्रावणातील उपवास करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी तसेच आपण उपवास करताना कोणत्या चुका करतो ते पाहूयात, या चुका टाळून आपण आपल्या आरोग्याची आणि शरीराची काळजी घेऊ शकतो(The five common mistakes people make when fasting). 

उपवास करताना या ५ चुका करु नका... 

चूक १ :- दूध, दही सारख्या डेअरी प्रॉडक्ट्स सोबत फळं खाणे. 

उपवासाच्या दिवशी दह्यादुधाचे अनेक पदार्थ खाल्ले जातात. काहीजणांना फळांचे मिल्कशेक, फ्रुट कस्टर्ड यांसारखे पदार्थ उपवासा दरम्यान खायला आवडतात. परंतु दूध, दही सारख्या डेअरी प्रॉडक्ट्स सोबत फळं खाणे आरोग्याच्या दृष्ट्टीने खूपच हानिकारक असते. खरंतर, दुग्धजन्य पदार्थांमध्ये फॅट्स  आणि प्रथिने जास्त प्रमाणात असतात, जे फळांपेक्षा अधिक हळूहळू पचतात. फळांमधील आम्ल आणि एन्झाईम्स दुधाच्या प्रथिनांच्या पचनात समस्या निर्माण करू शकतात, जसे की केसिन, ज्यामुळे फळांचे पचन मंद होऊ शकते. यामुळे तुम्हाला आम्लता किंवा पोटदुखी होऊ शकते. त्यामुळे दुग्धजन्य पदार्थ आणि फळ खाण्यामध्ये नेहमी किमान २ तासांचे तरी अंतर ठेवावे. 

चूक २ :- सूर्यास्तानंतर खाणे. 

आयुर्वेदानुसार, सूर्यास्तानंतर म्हणजे संध्याकाळी कच्चे पदार्थ खाणे टाळावे कारण ते पचण्यास कठीण असतात. उपवासा दरम्यान, लोक बहुतेकदा सूर्यास्तानंतरच अन्नपदार्थ खातात, ज्यामध्ये बहुतेकदा सॅलड, कच्च्या भाज्या आणि फळे असतात, जे आपल्या आहाराचा भाग असतात. सूर्यास्तानंतर खाल्ल्याने पचन कमकुवत होऊ शकते आणि अपचन, गॅसच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुमची चयापचय क्रिया सर्वोत्तम असेल तेव्हा दिवसा फळे आणि सॅलड्स खाण्यास प्राधान्य द्यावे. 

चूक ३ :- तळलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात खाणे. 

उपवासात अनेकांना तळलेले अन्नपदार्थ खायला आवडतात. परंतु उपवासाच्या वेळी असे खाद्यपदार्थ खाणे टाळले पाहिजे. कारण अशा पदार्थांमध्ये फॅट्सचे  प्रमाण अधिक असते, ज्यामुळे वजन वाढू शकते आणि हृदयाशी संबंधित रोगांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे उपवासात तुमच्या आहारातील फॅट्सचे प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही कमी तेलात शिजवलेले किंवा भाजलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाण्याला प्राधान्य द्यावे. 

चूक ४ :- खूप गोड पदार्थ खाणे.  

उपवास करताना आपण शक्यतो काही मोजकेच पदार्थ खातो. उपवास करताना आपण फारसे खात नाही त्यामुळे आपल्याला दिवसभराची ताकद मिळावी यासाठी आपण गोड पदार्थ भरपूर प्रमाणात खातो.  उपवासाच्या वेळी, लोक त्यांच्या शरीरातील ऊर्जा आणि ग्लुकोजची पातळी वाढवण्यासाठी अधिक गोड खातात, ज्यामुळे आपले वजन वाढू शकते. यामुळे वजन वाढण्याची तसेच मधुमेह आणि दात किडण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी आर्टिफिशियल साखरेऐवजी फळांसारखे नैसर्गिक साखर असलेले पदार्थ खावेत.   

चूक ५ :- सारखे काहीतरी खात राहणे. 

उपवासाच्या वेळी जास्तीत जास्त वेळ न खाताच राहावे लागते, परंतु काही लोक उपवासाच्या वेळीही दर २ ते ३ तासांनी काहीतरी खात राहतात. अशा परिस्थितीत, आपण आपल्या भूकेबद्दल खूप जागरूक असणे आवश्यक असते. त्यामुळे वेळोवेळी काहीतरी खाण्याऐवजी, दिवसातून दोन किंवा तीन वेळा पुरेसे पाणी आणि हर्बल टी प्या जेणेकरून आपण वारंवार वरचेवर खाणे टाळू  शकाल.

Web Title: The five common mistakes people make when fasting Fasting Rules & Food What To Eat & What Not To Eat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.