Join us   

उपवास असेल तर दिवसभरात ७ गोष्टी करा आणि उपवास सोडतानाही ५ गोष्टी लक्षात ठेवा, तर उपवास होईल सोपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2023 5:25 PM

The Ideal Foods to Eat Before and After Fasting उपवास असेल तर काय खावं आणि काय टाळावं? नाहीतर उपवास करुन तब्येत बिघडते

श्रावण सुरु झाल्यानंतर अनेक सणवाराला सुरुवात होते. या दिवसात अनेक लोकं उपवास देखील धरतात. तर काही निर्जळी उपवास धरतात. या उपवासादरम्यान लोकं खाणे - पिणे टाळतात. मात्र, निर्जळी उपवासाचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून निर्जळी उपवास करणे चांगले नाही. निर्जळी उपवास केल्याने रक्तदाब कमी होतो, डिहायड्रेशन, थकवा जाणवणे, चक्कर येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे उपवास धरताना किंवा उपवास सोडताना काय खावं - काय टाळावं, याची माहिती असणं गरजेचं आहे.

जर आपल्याला उपवास धरून स्वतःला तंदुरुस्त ठेवायचं असेल तर, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. निर्जळी उपवास धरण्यापूर्वी काय खावं? उपवास सोडताना आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा? याची माहिती आहारतज्ज्ञ दीपशिखा अग्रवाल यांनी दिली आहे(The Ideal Foods to Eat Before and After Fasting).

उपवास धरण्यापूर्वी काय खावं?

- शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, उपवास धरण्यापूर्वी बदाम आणि अक्रोड खा. यामुळे एनर्जी बुस्ट होईल, व दिवसभर काम करण्याची उर्जा मिळेल.

- अनेकदा उपवास धरताना अॅसिडिटीचा त्रास होतो. त्यामुळे रिकाम्या पोटी आवळ्याचा मुरंबा खा. यामुळे पोट फुग्ण्याचा त्रास कमी होईल. यासह थकवा देखील जाणवणार नाही.

- आपल्या आहारात किवीचा समावेश करा. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होईल. परंतु, मधुमेहीग्रस्त रुग्णांनी याचे सेवन करू नये.

- अॅसिडिटी त्रास होत असेल तर. जिऱ्याचे पाणी प्या. फक्त उपवास धरल्यावरच नाही तर, दररोज जिऱ्याचे पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे वजन देखील कमी होण्यास मदत होते. यासाठी पाण्यात एक चमचा जिरे घालून उकळवण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर हे पाणी प्या.

कोणती डाळ खाल्ल्याने गॅसेसचा त्रास होतो? अपचन-करपट ढेकर येतात? ५ डाळी करा बाद कारण..

- सकाळी उठल्यानंतर गुळाचा खडा खा. किंवा साखरेऐवजी गुळ खा. गुळामध्ये लोह आढळते. यामुळे दिवसभर काम करण्याची उर्जा मिळेल.

- उपवासाच्या वेळी किंवा उपवासाच्या आधी नारळ पाणी प्या. यामुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच शिवाय शरीर हायड्रेटही राहते.

उपवास सोडताना काय खावे?

- उपवास सोडताना सगळं काही एकत्र खाऊ नका. यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी आंबट फळे खाऊ नका, आम्लपित्त होण्याची शक्यता वाढते.

- जेवणाची सुरुवात एक वाटी पपई किंवा फळ खाऊन करावी.

शेवग्याच्या शेंगा खाण्याचे १२ फायदे! आरोग्यासाठी शेवगा म्हणजे वरदान, शेंगा रोज खा कारण..

- उपवास सोडल्यानंतर आपण दही खाऊ शकता. यामुळे पोटाचे विकार छळणार नाही.

- फळे खाल्ल्यानंतर एक तासाने असे पदार्थ खा, जे सहज पचतील. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्न