Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पावसाळ्यातही फ्रिजमधलं थंड पाणी घटाघट पिताय? तज्ज्ञ सांगतात, गार पाणी पिण्याने काय होतं...

पावसाळ्यातही फ्रिजमधलं थंड पाणी घटाघट पिताय? तज्ज्ञ सांगतात, गार पाणी पिण्याने काय होतं...

The impact of drinking cold water during monsoon season : पावसाळ्यात थंड पाणी प्यायल्याने तब्येतीवर कसा परिणाम होतो वाचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2024 08:37 PM2024-07-31T20:37:10+5:302024-07-31T20:49:10+5:30

The impact of drinking cold water during monsoon season : पावसाळ्यात थंड पाणी प्यायल्याने तब्येतीवर कसा परिणाम होतो वाचा...

The impact of drinking cold water during monsoon season Is Cold Water Really the Best Choice for monsoon | पावसाळ्यातही फ्रिजमधलं थंड पाणी घटाघट पिताय? तज्ज्ञ सांगतात, गार पाणी पिण्याने काय होतं...

पावसाळ्यातही फ्रिजमधलं थंड पाणी घटाघट पिताय? तज्ज्ञ सांगतात, गार पाणी पिण्याने काय होतं...

आपल्यापैकी बऱ्याचजणांना वर्षाचे बाराही महिने फ्रिजमधील थंड पाणी पिण्याची सवय असते. ऋतू कोणताही असो तहान लागली की फ्रिजमधील थंड पाणीच पिणे पसंत करतात. कडाक्याच्या उन्हाळ्यात एकवेळ असे थंड पाणी पिणे सहाजिक आहे, परंतु हिवाळा आणि पावसाळ्यात असे थंड पाणी पिणे शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. पाणी पिऊन आपण शरीराला हायड्रेट आणि निरोगी ठेवू शकतो. पावसाळ्याच्या दिवसातही शरीर हायड्रेट ठेवणे गरजेचे असते.

दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. पावसाळ्याच्या दिवसातही चिकट आणि दमट हवामानामुळे थंड पाणी प्यावेसे वाटते. त्यामुळे काहीजण फ्रिजमधील थंड पाण्याची बाटली काढून ते गार पाणी पितात. परंतु असे केल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. फ्रिजचे थंड पाणी प्यायल्यास आपण आजारी पडू शकतो. फ्रिजमधल पाणी पिणं कोणत्याही ऋतूत आरोग्यासाठी चांगलं नसलं तरी विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात फ्रिजमधील थंड पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकत. दिल्लीच्या होली फॅमिली हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ सना गिल यांनी पावसाळ्यात फ्रिजमधील थंड पाणी (cold water) पिण्याने काय नुकसान होते याबद्दल अधिक माहिती दिली आहे. पावसाळ्यात फ्रिजमधील थंड पाणी न पिता नेमके कोणत्या प्रकारचे पाणी प्यावे हे समजून घेऊयात(The impact of drinking cold water during monsoon season).

पावसाळ्यात थंड पाणी पिण्याचे दुष्परिणाम :- 

पावसाळ्यात रेफ्रिजरेटरचे थंड पाणी प्यायल्याने आरोग्याचे अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते :- 

१. पावसाळ्यात थंड पाणी पिण्यामुळे घशातील टिश्यू सुकून त्या आकुंचित होऊ शकतात, यामुळे घसा खवखवणे किंवा सर्दी यांसारखे छोटे - मोठे आजार होऊ शकतात.
२. थंड पाणी प्यायल्याने पचनक्रिया मंदावते, कारण थंड पाण्यामुळे पचन संस्थेवर परिणाम होतो आणि अन्ननलिकेतील रक्ताभिसरण कमी होते.
३. पावसाळ्यात बाहेरच्या तापमानाची आणि आर्द्रतेची अस्थिरता वाढते आणि त्यामुळे शरीराच्या तापमानावरही परिणाम होतो. 

रात्री झोपताना कोणत्या प्रकारच्या ब्रेसियर घालू नयेत? नको त्या आजारपणाचा वाढतो धोका...

४. थंड पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान अचानक कमी होऊ शकते, ज्यामुळे सर्दी आणि खोकल्याचा धोका वाढतो.
५. थंड पाणी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकते, ज्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
६. थंड पाणी प्यायल्याने वारंवार तहान लागते कारण त्यामुळे शरीराचे तापमान अस्थिर होते.

सगळ्यांनाच थंड पाणी पिऊन अशा प्रकारचा त्रास होतोच असे नाही. काहीजणांना यात कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागत नाही. पण असे असूनही पावसाळ्यात रेफ्रिजरेटरचे थंड पाणी पिणे टाळावेच.

वजन वाढतंच नाही, लुकडी म्हणून लोक चिडवतात? भातासोबत खा ६ पदार्थ, वजन वाढेल लवकर आणि व्हाल फिट...
 

पावसाळ्यात नेमके कोणते पाणी प्यावे ?

१. पावसाळ्यात पाणी पिताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, कारण या ऋतूत आर्द्रता आणि तापमानात बदल झाल्यामुळे आरोग्याच्या समस्या अधिक वाढू शकतात.

२. पावसाळ्यात गरम करुन उकळवून घेतलेले किंवा कोमट पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. हे पचन सुधारते त्याचबरोबर सर्दी आणि घशाच्या समस्यांपासून देखील आपला बचाव करण्यास मदत करते. 

३. पावसाळ्यात घाण पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो, त्यामुळे फिल्टर केलेले पाणी किंवा उकळलेले पाणी पिणे हा सर्वोत्तम उपाय आहे.

४. नेहमी फ्रेश आणि स्वच्छ पाणी प्या. जास्त दिवस स्टोअर करुन ठेवलेले किंवा उघड्यावर ठेवलेले पाणी पिणे टाळावे. याशिवाय पाण्याची टीडीएस पातळीही वेळोवेळी तपासा.

Web Title: The impact of drinking cold water during monsoon season Is Cold Water Really the Best Choice for monsoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.