धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराला अनेक आजार छळतात. कळत - नकळत आपण आपल्या आजारांवर लक्ष देत नाही. ज्यामुळे कमी वयात गंभीर आजार शरीरात उद्भवतात. आपल्याला शरीरात अनेक अवयव आहेत, त्यातील मुख्य अवयव म्हणजे किडनी. किडनी निरोगी असल्यास अनेक आजारांवर मात करता येते. किडनी योग्यरित्या साफ झाली नाही तर, मूतखडा, इन्फेक्शन असे आजार उद्भवतात.
किडनीला निरोगी ठेवण्यासाठी लोकं पपई, सातूचे पीठ यासह पौष्टिक आहार घेतात. पण आपण कोथिंबीरचे सेवन करून देखील किडनीला निरोगी ठेऊ शकता. यासंदर्भात, लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या आहारतज्ञ काजल तिवारी यांनी, कोथिंबीरचे सेवन कसे करावे, किडनीसाठी कोथिंबीर का उपयुक्त आहे, याबाबतीत माहिती दिली आहे(The Impressive Benefits Of Coriander For Kidney Health).
किडनीसाठी कोथिंबीर उपयुक्त
किडनी निरोगी ठेवण्यासाठी लोकं मुळा, पपई आणि ज्वारीचे पीठ खातात. आपण यात कोथिंबीरचा देखील समावेश करू शकता. कोथिंबीर, केवळ क्रिएटिनिनची पातळी कमी करत नाही तर, रक्तातील सीरम युरिया आणि युरिया नायट्रोजन देखील कमी करते.
कोथिंबीरमध्ये कोरिअँड्रम सॅटिव्हम नावाचा अर्क असतो, जो किडनीच्या हिस्टोलॉजिकल जखमांना सुधारतो. जे फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉलसह, नेफ्रोप्रोटेक्टिव्ह फायटोकेमिकल उपक्रमाला चालना देते. ज्यामुळे मूत्रपिंड स्वच्छ करण्यास मदत होते.
दह्यात मीठ घालून खावे की साखर? तज्ज्ञ सांगतात काय फायद्याचं - कशाने बिघडते तब्येत
या गोष्टींची काळजी घ्या
आहारतज्ञ काजल तिवारी सांगतात, ''हिरव्या कोथिंबीरमध्ये फायबर, लोह आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते, ज्याच्या सेवनाने आपली किडनी निरोगी राहते. किडनीसाठी कोथिंबीरच्या ज्यूसचे सेवन करण्यापूर्वी, डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक. कारण अनेक रुग्णांमध्ये पोटॅशियमची पातळी जास्त असते, अशा परिस्थितीत त्यांना कोथिंबीरचा रस देणे टाळा.''