Join us   

मुठभर मुरमुरे खाण्याचे ५ जबरदस्त फायदे, पचन सुधारेल-वजनही होईल कमी, हाडांना मिळेल बळकटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2023 3:05 PM

The Incredible Benefits Of Adding Murmura To Your Diet : मुरमुरे खा आणि फिट राहा, पाहा छोट्या पफ्ड राईसमध्ये दडलंय फायदे अनेक..

फिटनेस फ्रिक (Fitness Diet) लोकांचं स्नॅक्स म्हणजे मुरमरे (Murmura). ज्याला काही जण पफ्ड राईस देखील म्हणतात. मुरमुऱ्याचे अनेक पदार्थ केले जातात. यापासून तयार पदार्थ झटपट रेडी होतात. काही लोकं मुरमुऱ्याचा चिवडा, भडंग किंवा भेळ तयार करतात. काही लोकं यात प्रयोग करून डोसे किंवा इडलीही तयार करतात. पण मुरमुरे खाण्याचे आपल्याला आरोग्यदायी फायदे ठाऊक आहे का? मुरमुऱ्यांमध्ये प्रोटीन, आयर्न, पोटॅशियम, गुड फॅट्स, कार्बोहायड्रेट्स असतात. यासह व्हिटॅमिन बी, मिनरल्स, कॅल्शियम देखील मुबलक प्रमाणात असते (Health Benefits).

मुरमुरे खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात, याबद्दलची माहिती पोषणतज्ज्ञ आणि वेलनेस एक्सपर्ट वरूण कत्याल यांनी दिली आहे(The Incredible Benefits Of Adding Murmura To Your Diet).

मुरमुरे खाण्याचे फायदे

पोटाचे विकार होतील दूर

नियमित मुरमुरे खाल्ल्याने पोटाचे अनेक विकार दूर होतात. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पचन तर सुधारतेच, शिवाय बद्धकोष्ठता किंवा पोटदुखीचा त्रासही कमी होतो. अशावेळी आपण मुठभर मुरमुरे खाऊ शकता.

फिट-प्रॉडक्टिव्ह राहायचंय? पण स्वतःसाठी वेळ मिळत नाही? फॉलो करा ९-१ रूल, अकाली वयात गंभीर आजारांचा धोका टळेल..

हाडांना करते मजबूत

नियमित मुरमुरे खाल्ल्याने हाडांना मजबुती मिळते. त्यात कॅल्शियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते, जे केवळ हाडे मजबूत करत नाही तर, सांधे संबंधित समस्यांपासून आराम देते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मुरमुरे फायदेशीर ठरू शकते. मुरमुऱ्यांमध्ये फायटोकेमिकल्स, खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. जे केवळ कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करत नाही तर, शरीराचे अनेक संक्रमणांपासून सरंक्षण करते.

वजन कमी करण्यास मदत

वजन कमी करताना कॅलरीजकडे अधिक लक्ष द्यावे लागते. पोषणतज्ज्ञ कमी कॅलरीजयुक्त आहार घेण्यास सांगतात. वेट लॉस दरम्यान आपल्याला स्नॅक्स खायची इच्छा झाली असेल तर, आपण मुठभर मुरमुरे खाऊ शकता. मुरमुऱ्यांमध्ये कॅलरीज कमी असतात. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.

हाडांना मिळणार बळकटी-दातही राहतील मजबूत, फक्त न चुकता खा कॅल्शियमयुक्त ५ पदार्थ, आरोग्यासाठी उत्तम

मेंदू होतो तीक्ष्ण

मुरमुऱ्यांमध्ये न्यूरोट्रांसमीटर पोषक तत्व असतात. जे केवळ मेंदूच्या विकासातच मदत करत नाहीत तर, मेंदूच्या मज्जातंतूंना उत्तेजित करण्यासही मदत करते. ज्यामुळे मेंदूला चालना मिळते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यवेट लॉस टिप्स