Join us   

उपाशी पोटी गूळ पाणी पिण्याचे फायदे अनेक; सर्दी खोकल्यापासून आराम - वजनही झरझर घटेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2024 5:39 PM

The REAL reason why you must have ‘Gud Water’ empty stomach : गूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे तज्ज्ञ रिकाम्या पोटी गुळाचे पाणी पिण्याचा सल्ला देतात.

गूळ हे एक नैसर्गिक स्वीटनर आहे (Health Tips). त्यात अनेक प्रकारचे पौष्टीक घटक आढळतात. त्यात पोटॅशियम, कॅल्शियम, जस्त, फॉस्फरस आणि कॉपर देखील आढळते (Gud Water). आपण साखरऐवजी गुळाचा वापर करू शकता. जर आपल्या आजूबाजूच्या परिसरात प्रदूषित वातावरण असेल तर, आहारात नक्कीच गुळाचा समावेश करा. अनेक तज्ज्ञ देखील गुळाचे पाणी पिण्याचा सल्ला देतात.

योग प्रशिक्षक अवनी तलसानिया देखील रोज गुळाचे पाणी पितात. आईस्ड टी आणि लिंबूपाणी व्यतिरिक्त आपण गुळाचे पाणी पिऊ शकता. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत(The REAL reason why you must have ‘Gud Water’ empty stomach).

तज्ज्ञांकडून जाणून घ्या गुळाचे पाणी पिण्याचे फायदे

'आयुर्वेदानुसार, कोमट पाण्यात गूळ मिसळून प्यायल्याने शरीर तंदुरुस्त राहते. हे एक अँटीडोट म्हणून काम करते. हे नैसर्गिक पाचक एन्झाईम्स वाढवते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. शिवाय मूत्रपिंडाशी संबंधित आजारांपासूनही आराम मिळतो.'

सर्दी खोकल्यापासून आराम

पौष्टिकतेने परिपूर्ण गुळाचे पाणी प्यायल्याने सर्दी, खोकला आणि फ्लूची लक्षणे कमी होतात. त्यात अनेक फिनोलिक संयुगे असतात, जे ऑक्सिडेटिव्ह तणावाशी लढण्यास मदत करतात. शिवाय रोगप्रतिकारशक्तीही मजबूत करतात.

'गळ्यान साखळी सोन्याची..' पाळीव कुत्र्यासारखे घेतली सोन्याची चेन, एवढे लाड का - ती सांगते..

शरीर डिटॉक्स करते

शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी गुळाचे पाणी फायदेशीर ठरते. गुळात फायबरचे प्रमाण जास्त असते. जे पचनसंस्था साफ करण्यास मदत करते. फुफ्फुस, अन्न पाईप, पोट आणि आतडे देखील स्वच्छ करते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

गुळाचे पाणी संसर्गाविरूद्ध प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. गुळामध्ये मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी१, बी६ आणि सी असते.  यासोबतच गुळात अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

वजन कमी करण्यात फायदेशीर

शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी गुळाचे पाणी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये असलेले पोटॅशियम शरीरातील इलेक्ट्रोलाइट आणि मिनरल्सचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत करते. चयापचय वाढवते आणि वजन कमी करण्यास मदत करते.

गुळाचे पाणी तयार कसे करावे?

लागणारं साहित्य

गूळ

चिया सीड्स

थकवा येतो काम पूर्णच होत नाही? १ चमचा मधाचा करा ‘असा’ उपाय; सद्गुरू सांगतात वाढेल ताकद

लिंबाचा रस

पुदिना

कृती

सर्वात आधी एका भांड्यात एक ग्लास पाणी घ्या. त्यात एक गुळाचा खडा घाला. गूळ पाण्यात उकळ्यानंतर १० ते १५ मिनिटांसाठी तसेच ठेवा. पाणी कोमट झाल्यानंतर त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. आपण त्यात चिया सीड्स आणि पुदिन्याची पानं देखील घालू शकता. 

टॅग्स : आरोग्यवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्स