Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पाणी पिताना लक्षात ठेवावेत असे ४ नियम, जास्त किंवा कमी पाणी पिणंही घातकच कारण..

पाणी पिताना लक्षात ठेवावेत असे ४ नियम, जास्त किंवा कमी पाणी पिणंही घातकच कारण..

The Right Way to Drink Water : सकाळी चहा पिण्यापूर्वी किमान एक ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 05:32 PM2023-01-27T17:32:18+5:302023-01-28T14:16:14+5:30

The Right Way to Drink Water : सकाळी चहा पिण्यापूर्वी किमान एक ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. 

The Right Way to Drink Water : 4 rules for drinking water as per Ayurveda | पाणी पिताना लक्षात ठेवावेत असे ४ नियम, जास्त किंवा कमी पाणी पिणंही घातकच कारण..

पाणी पिताना लक्षात ठेवावेत असे ४ नियम, जास्त किंवा कमी पाणी पिणंही घातकच कारण..

शरीरासाठी पाणी पिणं खूपच महत्वपूर्ण आहे. (Drinking Water) आपल्या शरीरात ६० ते ६५ टक्के पाणी आहे.  शरीरातलं पाणी कमी झाल्यामुळे संतुलन बिघडतं. सकाळी उठल्यानंतर भरपूर पाणी प्यायल्यास शरीर निरोगी राहते. आपल्या देशातील बहुतेक लोक सकाळी उठल्यानंतर चहा पितात. मात्र, चहा पिण्यापूर्वी त्यांनी किमान एक ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.  (4 rules for drinking water as per Ayurveda)

जर तुम्ही सकाळी पाणी प्यायले तर ते शरीरातून विष काढून टाकते. किडनीला घाण बाहेर काढण्यास मदत करते. असे म्हणतात की पाणी प्यायल्याने त्वचेचे आरोग्यही सुधारते. तुमच्या त्वचेचा 30 टक्के भाग पाणी आहे. अशावेळी पाणी प्यायल्याने त्वचेचीही चमक वाढते. (What is the benefits of drinking lots of water)

सकाळी लवकर पाणी प्यायल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.  याशिवाय आजारांचा संसर्ग टाळण्यासही मदत होते. (Benefits of drinking water and other water facts) त्यासाठी पाणी पिण्याचे ४ बेसिक नियम माहित करून घ्यायला हवेत. 

१) सकाळी सर्वात आधी पाणी प्या, यालाच आयुर्वेदात उषापना म्हणतात. निरोगी राहण्यासाठी कोमट पाणी (उषपान) किंवा तांब्याचे पाणी प्यावे, या आरोग्यदायी सवयीचे अविश्वसनीय फायदे आहेत.

२) जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नका. कारण जर तुम्ही जेवणानंतर लगेच पाणी प्यायले तर तुमचे अन्न हळूहळू पचले जाईल आणि तुमची चयापचय क्रिया बाधित होईल आणि पचनशक्ती कमी होईल.

३) नेहमी बसून पाणी प्या, घाईघाईने किंवा उभे राहून पाणी पिऊ नका.

४) पाणी साठवण्यासाठी प्लास्टिकच्या कंटेनरचा वापर करू नका, प्लास्टिकमध्ये असलेल्या सूक्ष्म कणांमुळे कर्करोगाचा धोका वाढतो, तसेच हार्मोनल असंतुलन आणि इतर रोगांचा धोका वाढतो.

Web Title: The Right Way to Drink Water : 4 rules for drinking water as per Ayurveda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.