Join us   

नाजूक भागाभोवतीची त्वचा काळी पडली, प्रचंड खाज येते? हा आजार की गंभीर आजाराचे लक्षण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2023 6:05 PM

This Is Why Your Private Area Is Dark, Plus Other Must-Knows नाजूक भागातील त्वचा काळी पडणे हे वयानुसार बदलते. मात्र विविध प्रॉडक्टचा अतिरिक्त वापर घातक ठरते

नाजूक जागेची त्वचा अचानक फार काळवंडणे, खाज येणे असा त्रास अनेकींना होतो. काहीजणी व्हजायनल व्हॅक्स अनेकदा करतात त्याचीही रॅश येते आणि नाजूक भागाजवळची जागा काळी पडते. हे कशाने होते. हा आजार की कुठल्या आजाराची लक्षणं?

यासंदर्भात नवी दिल्लीतील त्वचाशास्त्रज्ञ डॉ निरुपमा परवांदा सांगतात, “अनेक वेळा, योनीच्या आजूबाजूच्या भागात फंगल इनफेक्शन झालेले असते.  ज्यामुळे त्या भागांवर गडद डाग उद्भवू शकतात, यासह जेव्हा महिलांचे वजन वाढते तेव्हा मांड्याना मांड्या घासल्यामुळे, हार्मोनल बदल, त्या जागेवरील ओलेपणा, मासिक पाळीचा अतिरिक्त स्त्राव यामुळे योनीच्या अवतीभोवतीची जागा खूप काळी पडू शकते.

नक्की कारणं काय?

वय

त्वचेवरील बदल वयोमानानुसार बदलत राहते. ज्यामध्ये त्वचेचा रंग, लवचिकता, टोन कालांतराने बदलत जाते. त्याच प्रमाणे योनीजवळील त्वचेवरील भाग हा देखील बदलत जातो. मांड्यांवरील त्वचा ही कोमल असते. त्यामुळे वयोमानानुसार त्वचेच्या पोतदेखील बदलतो.

हार्मोन्स

इस्ट्रोजेनसारख्या संप्रेरकांमुळेही योनी जवळील त्वचा काळवंडते. विशेषत: पौगंडावस्था, गर्भधारणा किंवा रजोनिवृत्ती दरम्यान. शरीरातील काही भाग, जसे की स्तनाग्र आणि गुदद्वाराभोवतीची त्वचा, लक्षणीयपणे गडद होते. त्यामुळे ही समस्या उद्भवते.

जळजळ आणि खाज

नाजूक भाग काळपट पडण्यामागे मुख्य कारण म्हणजे जळजळ आणि खाज, यामुळे देखील त्वचा काळवंडते. यासह टाईट अंडरवेअर, व्यायाम, चालणे आणि सेक्स या कारणांमुळे देखील त्वचा काळवंडते. मांड्या एकमेकांना घासल्यामुळे हायपरपिग्मेंटेशन होण्याची शक्यता असते.

ओलेपणामुळे त्वचेचा रंग बदलतो

योनी जवळील भाग हा सामान्यतः फॅब्रिकने झाकलेले असतात, ज्यामुळे त्वचेला श्वास घेण्यासाठी पुरेशी हवा मिळत नाही. ताजी हवेच्या कमतरतेमुळे ओलेपणा जमा होतो आणि त्वचेचा रंग बदलण्यास सुरुवात होते. अशा परिस्थिती सिंथेटिक ऐवजी सूती अंडरवेअर परिधान करा, घट्ट कपडे शक्यतो टाळा. योनी जवळील जागा नेहमी स्वच्छ ठेवा.

सॅनिटरी पॅडमुळे देखील त्वचा काळवंडते

मासिक पाळीच्या काळात वापरले जाणारे सॅनिटरी पॅडही यासाठी कारणीभूत ठरू शकतात. काही महिला रात्रीपर्यंत एकच सॅनिटरी पॅडचा वापर करतात. ज्यामुळे सॅनिटरी पॅडचा चोळा-मोळा होतो आणि ते मांड्यांमध्ये रुतायला लागतात. जर त्वचा नाजूक असेल तर जांघेत आणि पृष्ठ भागावर जखमा होण्याची अधिक शक्यता असते.

शेविंगमुळे

शेविंगमुळे योनी जवळील नाजूक भाग काळवंडते. वारंवार केस काढल्यामुळे त्वचेला त्रास होतो. शेविंग क्रीम अथवा इतर रासायनिक उत्पादनांमुळे त्वचेला हानी पोहचते. त्याऐवजी वॅक्सिंग किंवा लेझरचा वापर करा. यासह वारंवार त्या नाजूक त्वचेवर कोणत्याही उत्पादनांचा वापर करू नका.

टॅग्स : महिलाहेल्थ टिप्स