Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ‘हे’ ३ पदार्थ नाश्त्याला खा-दिवसभर इतकं एनर्जेटिक वाटेल की काम कराल दणकून!

‘हे’ ३ पदार्थ नाश्त्याला खा-दिवसभर इतकं एनर्जेटिक वाटेल की काम कराल दणकून!

The top 3 breakfast foods for a high-energy day : सकाळी रिकाम्या पोटी 'हे' पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2024 05:00 PM2024-08-14T17:00:17+5:302024-08-14T17:04:51+5:30

The top 3 breakfast foods for a high-energy day : सकाळी रिकाम्या पोटी 'हे' पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते..

The top 3 breakfast foods for a high-energy day | ‘हे’ ३ पदार्थ नाश्त्याला खा-दिवसभर इतकं एनर्जेटिक वाटेल की काम कराल दणकून!

‘हे’ ३ पदार्थ नाश्त्याला खा-दिवसभर इतकं एनर्जेटिक वाटेल की काम कराल दणकून!

रात्री जेवल्यानंतर सकाळपर्यंत अन्न पचते आणि मग पोटही रिकामे होते (Health Tips). त्यामुळे सकाळचा आहार महत्वाचा. नाश्ता केल्याने आपल्याला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते (Energetic Day). शिवाय अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. पण सकाळी काही ॲसिडिक खाल्ले तर, पोटात ॲसिडीटी निर्माण होते. त्यामुळे सकाळी काय खावं? काय टाळावं? असा प्रश्न निर्माण होतो.

सकळी अनहेल्दी पदार्थ खाल्ल्याने दिवसभर आपल्याला त्रास होतो. पण हेल्दी पदार्थ खाल्ले तर, दिवसभर एनर्जेटिक वाटते. आहारतज्ज्ञ किरण कुकरेजा यांनी पोटाच्या आरोग्यासाठी, स्किन आणि हेल्थसाठी नाश्त्यामध्ये काय खावं? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर, नाश्त्यामध्ये ३ गोष्टी खा(The top 3 breakfast foods for a high-energy day).

रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टी खावे?

फ्रेश नारळ

आहारतज्ज्ञांच्या मते, नारळात आढळणारे हेल्दी फॅट्स त्वचेतील अनेक समस्या दूर करतात. शिवाय अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात. यामध्ये प्रोटिन्स, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह भरपूर प्रमाणात असतं. याशिवाय फॉस्फरस, तांबे आणि अँटीऑक्सिडंट्सचाही उत्तम स्रोत आहे. आपण सकाळी रिकाम्या ओल्या खोबऱ्याचे २ - ३ तुकडे खाऊ शकता.

बैठ्या कामामुळे पोट नुसतं सुटलंय? जेवल्यानंतर १० मिनिटे 'ही' गोष्ट करा; लवकरच पोट सपाट

ताज्या भाज्यांचे रस

ताज्या भाज्यांच्या रसामध्ये भरपूर फायबर असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.  याशिवाय, शरीरातील घाणेरडे विष काढून टाकण्यासही उपयुक्त आहे. आपण सकाळी एक ग्लास कोणत्याही भज्याचा रस, काकडी आणि कोथिंबिरीचा रसही पिऊ शकता.

सफरचंद

आपण नाश्त्यामध्ये सफरचंद खाऊ शकता. सफरचंदमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, मिनरल्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. सफरचंद खाल्ल्याने पोटात भर राहते. ज्यामुळे आपण उलट सुलट पदार्थ खाणं टाळतो.

भरपूर चालूनही वजन घटेना? 'या' पद्धतीने - 'या' वेळी चाला, वेट लॉस होणारच; फक्त चालताना..

रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टी खाऊ नयेत

रिकाम्या पोटी असे अनेक पदार्थ आहेत, जे खाणं टाळावे. ज्यामुळे पोट बिघडू शकते. या गोष्टींमध्ये कॉफीचाही समावेश आहे. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यास पोटात ॲसिड तयार होते. त्याचप्रमाणे मसालेदार पदार्थ खाल्ल्याने ॲसिडिटी होते. आंबट फळे, कार्बोनेटेड पेये, गोड पदार्थ आणि प्रोसेस्ड फूड रिकाम्या पोटी खाणं टाळावे.

Web Title: The top 3 breakfast foods for a high-energy day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.