Join us   

पोटात नुसती आग? गॅसेसचा त्रास? उन्हाळ्यात हे ५ जादूई पदार्थ खा, पोटाला मिळेल गारवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2024 3:26 PM

These 5 foods can help you cool your stomach in summers : पचनाच्या समस्या टाळण्यासाठी या घरगुती गोष्टी ठरतील वरदान

उन्हाळा सुरु झाला की, पोटाचे विकार, मळमळ आणि छातीत जळजळ यासारख्या पचनाच्या निगडीत समस्यांचा धोका वाढतो (Summer Special). या सर्व समस्या टाळण्यासाठी, हलका आहार घेणं गरजेचं (Stomach Health). शक्यतो या दिवसात आपण मसालेदार आणि फ्राईड पदार्थ खाणं टाळायला हवे.

उन्हाळ्यात मसाले खाऊ नये असं काही लोकांचा समज आहे. पण काही मसाले खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. शिवाय आरोग्यही सुधारते आणि पोटाचे विकारही दूर राहतात. जर उन्हाळ्यात पोटात आग, आणि पचनाचा त्रास होत असेल तर, आहारात ४ पदार्थांचा समावेश करा. पोटाला थंडावा मिळेल, आरोग्य सुधारेल आणि पोटाचे विकारही दूर राहतील(These 5 foods can help you cool your stomach in summers).

धणे

धणे पचन सुधारते आणि पोट थंड ठेवते. आपण उकळत्या पाण्यात धणे घालू शकता. हे डिटॉक्स ड्रिंक प्यायल्याने वजन घटते शिवाय पोटाचे विकार दूर राहतात. धण्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे पोषक घटक असतात. जे आरोग्याला पुरेपूर फायदेशीर ठरतात.

सावधान! तुम्ही प्लास्टिकचा तांदूळ तर खात नाही ना? '४' टिप्स, प्लास्टिक तांदूळ ' असा ' ओळख

पुदिना

पुदिना पोटाला थंडावा देते. यातील अँटिऑक्सिडंट्स खराब पचन आणि उष्माघाताची समस्या टाळण्यास मदत करते. आपण पुदिन्याचा वापर अनेक भाज्यांमध्ये करू शकता. किंवा चटणी आणि चहाच्या स्वरूपात देखील घेता येऊ शकते. पोटदुखीवरही याचे सेवन फायदेशीर ठरते.

जिरे

जिरे पचनाला चालना देते, त्यामुळे अन्न लवकर पचते. जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-सी, कॉपर, मॅंगनीज, अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे शरीराला जळजळ होण्यापासून वाचवते. शिवाय जिर्‍याच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्सिफाई करण्यास मदत होते.

आलं

आलं हे अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटकांचा उत्तम स्रोत मानला जातो. आल्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो. आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. जे वजन कमी करण्यास मदत करतात.

उन्हाळ्यात तुम्ही सुद्धा उभं राहून पाणी पिता? ४ दुष्परिणाम; सांधेदुखी ते किडनीला त्रास; आरोग्य बिघडेल

बडीशेप

जेवल्यानंतर आपण चमचाभर बडीशेप खातो. यामुळे चयापचय सुधारण्यास मदत मिळते. त्यात व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, लोह, सेलेनियम, मॅंगनीज, जस्त, कॅल्शियम, पोटॅशियम आणि तांबे आढळते. मुख्य म्हणजे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. याच्या सेवनाने गॅस, ॲसिडीटी आणि इतर पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

टॅग्स : समर स्पेशलहेल्थ टिप्सआरोग्य