Join us   

दुपारी ऑफिसमध्ये भराभर डेस्कवर बसूनच जेवता? ५ सवयी बदला - परफॉर्मन्सही सुधारेल - स्ट्रेस होईल कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2023 12:55 PM

Experts share 5 healthy habits to help you live longer : दुपारी ऑफिसमध्ये कधीही जेवणे, वेळा न पाळणे तब्येतीसाठी अत्यंत घातक ठरू शकते...

सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण हा आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे. जर आपल्याला दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगायचे असेल तर आपल्याला स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी सहाजिकच आपला आहार व व्यायाम या सगळ्या गोष्टींना तितकेच महत्व देऊन ते फॉलो केले पाहिजे. आपल्याकडे असे मानले जाते की सकाळी उठल्यानंतर ते रात्री झोपण्यापर्यंत निरोगी सवयींचे पालन केल्याने शरीर निरोगी राहण्यास मदत होते. या सगळ्या दिवसाच्या रुटीनमध्ये दुपारचे जेवण देखील तितकेच आवश्यक असते. 

आपल्यापैकी बहुतेकजणांचे दुपारचे जेवण हे बहुदा कामाच्या ठिकाणी ऑफिसमध्येच होत असेल. दुपारच्या वेळीही काही आरोग्यदायी सवयींचे पालन केल्यास दीर्घायुष्य जगण्यास मदत होऊ शकते. अर्थात, दुपारच्या वेळी आपण आपल्या कामात व्यस्त असतो, पण कामाच्या दरम्यान काही सवयी अंगीकारल्याने आपले  शरीर तंदुरुस्त राहते. दुपारच्या जेवणाच्यावेळी नक्की कोणत्या सवयींचे पालन करावे, हे पाहूयात(These 5 healthy habits could help you live a decade longer).

दीर्घयुषी व निरोगी राहण्यासाठी नक्की कोणत्या सवयी पाळाव्यात... 

१. काम करा, परिणामाची काळजी करू नका :- आपण शक्यतो दुपारच्या जेवणाच्या वेळी आपल्या कामाच्या ठिकाणी ऑफिसमध्ये असतो. कामावर लक्ष केंद्रित करणे योग्य आहे, परंतु त्याचबरोबर स्वतःची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे आहे. काहीवेळा आपल्याला कामाचे प्रेशर किंवा काम जास्त असू शकते पण आपण ते पूर्ण करण्याचा विचार करा पण त्याचे टेन्शन घेऊ नका. ताण घेतल्याने आपले आयुष्य कमी होते, मग ते घरी असो किंवा कामावर. काही गडबड असल्यास विनाकारण काळजी करू नका आणि काम अर्धवट सोडू नका. मोठी कामे लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. यामुळे आपल्याला आनंद आणि समाधान मिळू शकते.

ब्लॅक कॉफी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का ? ब्लॅक कॉफी कधी आणि कशी प्यावी, पाहा खास टिप्स...

२. दुपारचे जेवण एकत्र करा :- दुपारचे जेवण ऑफिसमध्ये आपल्या मित्र - मैत्रिणींसोबत किंवा सहकाऱ्यांसोबत एकत्रित करण्याचा प्रयत्न करा. काही लोक एकटे, घाईत किंवा त्यांच्या डेस्कवर जेवणे पसंत करतात. त्यांच्या डोक्यात आणि मनात फक्त कामाचेच विचार असतात. ऑफिसमध्ये अर्धा - एक तास मिळणाऱ्या लंच ब्रेकचा वापर लंच ब्रेक म्हणूनच करा. या लंच ब्रेक दरम्यान कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींबद्दल बोला. दुपारचे जेवण एकत्र आणि योग्य वेळी  केल्याने आपल्या सहकाऱ्यांसोबत कनेक्शनची भावना निर्माण होते, ज्यामुळे आपल्याला रिफ्रेश होण्यास मदत मिळते. 

कोण म्हणतं वजन कमीच होत नाही? ४ साधे-सोपे उपाय-वजन कमी होणारच....

३. जेवणानंतर चालण्यासाठी थोडा वेळ काढा :- दिवसभर बसल्याने अनेक गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. कामातून वेळ काढून व्यायामासाठी थोडावेळ  जिममध्ये जा, फिरायला जा. याचबरोबर दुपारचे जेवण झाल्यावर किमान १० ते १५ मिनिटे तरी वेळ काढून फिरायला किंवा शतपावली करण्यासाठी द्यावा. अगदीच कामात बिझी असाल तर किमान ५ मिनिटे तरी ऑफिसच्या पॅसेजमध्ये फिरा. 

वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...

४. सोशली अ‍ॅक्टिव्ह व्हा :- दीर्घायुष्य जगण्यासाठी जवळपासच्या लोकांमध्ये सोशली अ‍ॅक्टिव्ह असणे आवश्यक आहे. मानव हा नैसर्गिकरित्या सामाजिक प्राणी आहे. यासाठीच आपल्या चांगल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आपल्याला इतर लोकांशी कनेक्टेड राहणे आवश्यक आहे. ऑफिसमधील सहकार्‍यांसोबत दुपारचे जेवण करा, कॉफी ब्रेक घ्या किंवा दुपारी आपल्या घरी आईला किंवा बायकोला फोन करा. ही छोटीशी कृती आपल्याला लोकांशी जोडण्यास मदत करेल. 

५. छोटीशी डुलकी काढा :- दुपारच्या जेवणानंतर कुणालाही झोप येणे हे सहाजिकच आहे. परंतु दुपारी तासंतास झोपण्यापेक्षा एक छोटीशी डुलकी काढणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. एक डुलकी आपल्याला फ्रेश करण्यासाठी पुरेशी असते. कामाच्या दरम्यान थोडीशी झोप घेतल्याने हृदय निरोगी राहण्यास मदत होते. दुपारी १५ ते ३० मिनिटे झोप मिळेल तशी झोप घ्या.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल