Join us   

लघवीचा रंग बदलला-फेस येताना दिसतो? लघवीतले ५ बदल वेळीच ओळखा, इन्फेक्शनचा धोका टळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 1:49 PM

These are 5 Reasons Of foamy Urine : किडनीवर ताण येतो आहे, लघवीचे आजार होऊ शकतात हे कसं ओळखायचं?

रक्ताबरोबरच लघवीतील बदल तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. याच कारणामुळे डॉक्टर युरिन टेस्टसुद्धा करायला सांगतात. लघवीच्या रंगातील बदल ओळखून त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. सामान्य स्थितीत लघवीचा रंग हलका पिवळा असायला हवा. (These are 5 Reasons Of foamy Urine) ज्यात फेस अजिबात असू नये. काही औषधांमुळे लघवीचा रंग  गडद होऊ शकतो आणि त्यात बबल्स दिसू शकतात पण तुम्ही औषधं घेणं बंद केल्यास  ही समस्या उद्भवणार नाही. (Causes Of Foamy Urine What it Mean)

किडनीशी संबंधित समस्या

जर तुम्हाला बिअरप्रमाणे फेसाळ लघवी होत असेल तर किडनीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.  किडनी रक्त साफ करते आणि लघवी शरीरातून बाहेर काढते. जर ही क्रिया व्यवस्थित केली नाही तर किडनीच्या आजाराचे लक्षण असू शकते.

जास्त प्रोटीन खाणं

जास्त प्रोटीन खाल्ल्याने किडनीसाठी रक्त साफ करणं कठीण होतं. खासकरून अशावेळ जेव्हा तुम्हाला आधीच किडनीशीसंबंधित समस्या असतील. कमकुवत किडन्यांमुळे शरीर लघवीच्या माध्यमातून प्रोटीन बाहेर काढणं सुरू करते. लघवीत जास्त प्रमाणात प्रोटीन असल्यास त्याला प्रोटीनुरिया असं म्हणतात. मुख्य स्वरूपात  ही समस्या गर्भवती महिला आणि आणि हृदय रोगाच्या लोकांमध्ये जास्त दिसून येते.

रीराला आतून पोखरते व्हिटामीन B-१२ ची कमी; ५ लक्षणं ओळखा-खा ५ पदार्थ, भरपूर व्हिटामीन मिळेल

इंसुलिनच्या स्तरामध्ये अधिक चढ-उतार झाल्यमुळ डायबिटीक रुग्णांमध्ये प्रोटीनुरियाची गंभीर समस्या निर्माण होते. कारण किडनीत रक्तप्रवाहावर परिणाम होतो. मधुमेहाशी लढत असलेल्या लोकांच्या किडनीची कार्यप्रणाली खराब होते. ज्यामुळे फेसाळ लघवी येते. 

थायरॉईडची समस्या

किडनी आणि थायराईडची समस्या एकमेकांना प्रभावित करते.  जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर किडनीच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो. असं केल्याने  किडनीचा कोणताही आजार झाल्यानंतर थायरॉईड ग्रंथी प्रभावित होते. एका अभ्यासानुसार  थायरॉईड हॉर्मोन शरीरात प्रोटीन संश्लेषणावर परिणाम करते. थायरॉईडची समस्या उद्भवल्यास किडनीवर परिणाम होते. ज्यामुळे किडनी फेल्युअरची समस्या उद्भवू शकते.

व्हिटामीनचा सुपर डोस आहेत १० रूपयांच्या शेवग्यांच्या शेंगा; 'या' पद्धतीने खा-प्रोटीन-कॅल्शियमही मिळेल

शरीरात पाण्याची कमतरता

जेव्हा तुम्ही कमी पाणी पिता तेव्हा मस्तकाला शरीातील पाणी संरक्षित करण्याचे संकेत मिळतात आणि किडनी रक्तातून कमीत कमी प्रमाणात पाणी बाहेर फेकते ज्यामुळे  लघवी फेसाळ होते. जर तुम्हाला वाटले की  लघवी असामान्य दिसत आहे तर सगळ्यात आधी स्वत:ला हायड्रेट ठेवा. 

टॅग्स : हेल्थ टिप्सलाइफस्टाइलआरोग्य