Join us   

पावसाळ्यात सतत आजारी पडता? प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून करा ४ गोष्टी, व्हायरल इन्फेक्शन होतील कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2024 5:23 PM

These Foods Will Help Boost Your Immunity This Monsoon : पावसाळ्यात तब्येत जपा; संसर्गामुळे आजारी पडण्याचा धोका जास्त असतो

पावसाळ्यात विविध प्रकारची रोगराई पसरते (Immunity Boost). कारण कडक उन्हानंतर दमट हवामान येते आणि त्यानंतर पावसामुळे संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो (Monsoon Season). या हंगामात विषाणू, बॅक्टेरिया किंवा बुरशीजन्य संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतो. असंख्य विषाणू आणि जीवाणू सर्वत्र घिरट्या घालू लागतात, जे आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही (Health Tips). पण ते हवेतून आपल्या शरीरात प्रवेश करतात. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. ज्यामुळे आपण या दिवसात वारंवार आजारी पडतो.

जर आपल्याला नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर, मुंबईच्या नानावटी मॅक्स हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ डॉ. रसिका माथूर यांनी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करा. यामुळे नक्कीच आरोग्याला फायदा होईल(These Foods Will Help Boost Your Immunity This Monsoon).

पावसाळ्यात काय खाणं टाळावे?

रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ नये म्हणून, सिगारेट, अल्कोहोलचे सेवन टाळावे. तसेच प्रोसेस्ड फूड, जंक फूड, फास्ट फूड  खाणं टाळावे. या गोष्टींमुळे शरीरात फ्री रॅडिकल्स तयार होतात, ज्यामुळे पेशींमध्ये ऑक्सिडेटिव्ह ताण वाढतो. शरीरात अधिक मुक्त रॅडिकल्स तयार झाल्यास कर्करोगाचा धोकाही वाढतो. त्यामुळे या गोष्टींचे सेवन शक्य तितके कमी करावे.

वाटीभर रवा - एक चमचा बेसन; स्पॉन्जी इस्टंट मसाला इडली ढोकळा कधी करून पाहिलं आहे का?

या गोष्टींचा आहारात समावेश करा

हंगामी फळ भाज्यांचा आहारात समावेश करा. यासह ज्या पदार्थांमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त आहे, त्या पदार्थांचे अधिक सेवन करा. यामुळे शरीरात फ्री रॅडिकल्स तयार होत नाहीत. यासोबत लिंबूवर्गीय फळांचे अधिक सेवन करा. या गोष्टी व्हिटॅमिन सी आणि पांढऱ्या रक्त पेशी वाढवतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. बीटरूट, एवोकॅडो, मुळा, रताळे, फ्लॉवर, कोबी, पालक, गाजर इत्यादींचे सेवन करा. अनेक प्रकारच्या बिया खा. विविध प्रकारच्या बियांमुळे शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यासाठी फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स, भोपळ्याच्या बिया इत्यादींचे सेवन करा.

नियमित व्यायाम करा

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित व्यायाम करा. आठवड्यातून १५० मिनिटे व्यायाम करणं गरजेचं आहे. यासाठी चालणे, जॉगिंग, शक्य असल्यास धावणे, सायकल चालवणे, पोहणे इत्यादी व्यायाम करा.

अनुष्का शेट्टीला झालाय हसण्याचा दुर्मिळ आजार; उगाचच हसण्याचा हा आजार नेमका असतो काय?

पुरेशी झोप

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पुरेशी झोपही महत्त्वाची आहे. पुरेशी झोप घेण्यासोबतच तणावही घेऊ नका. तणाव हा रोग प्रतिकारशक्तीचा शत्रू आहे. तणावातून मुक्त होण्यासाठी योग आणि मेडीटेशन करा. 

टॅग्स : मोसमी पाऊसहेल्थ टिप्सआरोग्य