काही जण असे असतात की आठवड्यातून एकदा तरी डोक्याला मस्तपैकी तेल लावून मालिश केल्याशिवाय त्यांचं होत नाही. तेल लावून डोक्याला मालिश केलं की त्यांना एकदम शांत, रिलॅक्स वाटू लागतं. पण हे फिलिंग तेवढ्यापुरतंच असू शकतं. कारण आयुर्वेद डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार काही व्यक्ती अशा आहेत ज्यांच्या प्रकृतीला तेल लावून डोक्याला मालिश करणं अजिबातच शक्य नसतं (people with 2 diseases should not apply oil to head). याविषयीच डॉक्टर नेमकं काय सांगत आहेत कोणासाठी तेल लावणं फायद्याचं असतं आणि कोणासाठी ते त्रासदायक ठरू शकतं हे एकदा पाहूया..(people who must avoid applying oil to head)
कोणत्या व्यक्तींनी डोक्याला तेल लावणं टाळायला हवं?
डोक्याला तेल लावून मालिश केल्यामुळे कोणत्या प्रकृतीच्या लोकांना त्रास होऊ शकतो, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ डॉक्टरांनी drmanasimehendale.dhamankar या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
फेशियल करायला वेळ नसतो तेव्हा माधुरी दीक्षित काय करते? बघा तिनेच सांगितलेला सोपा उपाय
यामध्ये डॉक्टर सांगत आहेत की ज्या व्यक्तींच्या नाकातून, डोळ्यातून सतत पाणी येत आहे, ज्या व्यक्तींच्या कानामध्ये पू झाला आहे, अशा व्यक्तींनी डोक्याला तेल लावणं टाळायला हवं. असा त्रास होणाऱ्या व्यक्तींच्या शरीरातला कफ वाढलेला असतो. तेल लावल्याने तो अधिक वाढू शकतो. त्यामुळे हा त्रास असेपर्यंत डोक्याला तेल लावून मालिश करू नका असं डॉक्टर सांगतात..
याचप्रमाणे ज्या व्यक्तींना आमवाताचा त्रास होतो म्हणजेच अंगावर नेहमीच सूज येत असते अशा व्यक्तींनीही डोक्याला तेल लावून मालिश करणं टाळायला हवं.
उन्हाळ्यात चेहरा खूपच चिपचिपित, तेलकट होतो? ४ टिप्स- त्वचा दिसेल फ्रेश, टॅनिंगही जाईल
कारण यामुळे त्यांच्या अंगावरची सूज जास्त वाढू शकते. यामध्ये डॉक्टरांनी असंही नमूद केलं आहे की असे सगळे त्रास होत असतील तर आधी तुमच्या जवळच्या वैद्यांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच तेल लावायचं की नाही हे ठरवा.