भाज्या खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. सर्व सिझनल भाज्या खायलाच हव्या. भाज्यांमध्ये भरपूर पोषण असते, ज्यामुळे पचनशक्ती मजबूत होते. जेवताना आपण कच्च्या भाज्यांची कोशिंबीर खातो. उन्हाळ्यात लोकांमध्ये सॅलेड खाण्याचे प्रमाण वाढते पण तसे खरंच करावे का? काकडी, टोमॅटो, कांदा, बीट, हिरव्या पालेभाज्या इत्यादींचा कच्च्या सॅलडमध्ये समावेश होतो.
आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर रेखा राधामोनी यांच्या मते, ''कच्च्या भाज्यांची कोशिंबीर खूप जास्त खाणं पचनाला फार बरे नाही. कच्च्या भाज्या थंड आणि कोरड्या असतात. ज्याचा थेट परिणाम वात दोषांवर होतो. वात, कफ आणि पित्त यांचा शरीरात समतोल राखणे आवश्यक आहे, अन्यथा आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. खूप कच्च्या भाज्या खाल्ल्या तर पचन बिघडते. वात वाढतो. पित्ताचा त्रासही होऊ शकतो''(Things you must keep in mind while having raw salad).
वात दोष वाढण्याची लक्षणं..
पोटात गॅस
पोट फुगणे
आतड्यांना सुज
बद्धकोष्ठतेची समस्या
त्वचेवर कोरडेपणा येणे
अंग दुखी
समजा, साखर पूर्णच बंद केली तर तब्येतीवर वाईट परिणाम होतात का?
शरीर थंड पडणे
तोंडातील चव बिघडणे
उपाय काय?
भाज्या नेहमी चांगल्या शिजवून गरम करून खा.
भाज्या शिजवून खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण पडत नाही, ते चांगले पचते.
हिरव्या पालेभाज्या शिजवण्यापूर्वी पाण्यात भिजवून नीट धुवून घ्या.
हिरव्या पालेभाज्या शिजवताना मसाले वापरा.
नखांवर नखं घासल्याने केसांची वाढ खरंच होते? काय खरं आणि काय खोटं, तज्ज्ञ सांगतात..
कच्च्या भाज्यांची कोशिंबीर अगदी थोडी, प्रमाणात खा.
आपले पोट, आतडे, व पचनसंस्था बरोबर असेल तर, कच्च्या भाज्या खा. जर आपल्याला पोटाच्या निगडीत समस्या असतील तर, भाज्या स्टीर फ्राय किंवा शिजवून खा. तसेच दररोज कच्च्या भाज्यांची कोशिंबीर खाणे टाळा.