Join us   

जांभूळ खाल्ल्याने खरेच डायबिटिस नियंत्रणात येते? काय खरं - काय खोटं, तज्ज्ञ सांगतात..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2023 5:24 PM

This is how Jamun keeps diabetes under control ब्लड शुगर कंट्रोल ते वजन कमी करण्यासाठी जांभूळ उपयुक्त, पाहा उपाय, व खाण्याची पद्धत

भारतात डायबिटिस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कमी वयात लोकांमध्ये ही समस्या वाढत चालली आहे. मधुमेह रुग्णांनी काय खावं काय टाळावं, याची काळजी बारकाईने घेतली जाते. कारण चुकीच्या आहाराच्या सेवनामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण बिघडू शकतं. रात्री जास्त लघवी होणे, तहान लागणे, अनावश्यक वजन कमी होणे, भूक लागणे, अंधुक दिसणे, हात-पाय सुन्न होणे, जखमा न भरणे, त्वचा कोरडी होणे, थकवा येणे ही लक्षणे डायबिटिस रुग्णांमध्ये दिसून येतात.

या आजारावर आजवर अनेक उपाय मार्केटमध्ये आले आहेत. काही उपाय फायदेशीर ठरतात तर, काही उपायांमुळे रक्तातील साखर अनियंत्रित होते. यावर उपाय म्हणून आपण टपोरे जांभूळ देखील खाऊ शकता. जांभळाच्या सेवनाने शरीराला अनेक फायदे मिळतात. याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रणात येऊ शकते(This is how Jamun keeps diabetes under control).

मधुमेह रुग्णांसाठी जांभूळ खाण्याचे फायदे

जांभूळ ठेवते 'इन्शुलीन'चे प्रमाण नियंत्रणात

पोषणतज्ञ किरण कुकरेजा यांच्या मते, '' जांभूळ हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न आहे, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते. त्यात इन्शुलीनची संवेदनशीलता वाढवणारी संयुगे आढळतात. त्यामुळे शरीर या हार्मोनचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करतात''.

वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यात मध घालून पिता? तब्येत सुधारेल की बिघडेल, खरं काय..

अशा प्रकारे खा जांभूळ

अख्खे जांभूळ

जांभळांच्या बियांचे पावडर

जांभळाच्या झाडाच्या सालीची पावडर

जांभळाच्या झाडाच्या पानांचा काढा

जांभूळ वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

जांभूळ या फळामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. यासह कॅलरीजचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत मिळते. जांभूळ खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते. ज्यामुळे जास्त भूक लागत नाही.

मुळव्याधाचा त्रास आहे? तज्ज्ञ सांगतात, केळी खा! पण नेमकी कधी-किती खायची?

रोगप्रतिकारशक्ती वाढेल, हृदय निरोगी राहील

मधुमेहावर उपचार करणारे जांभूळ रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवते. त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात, व इतर संसर्गापासून संरक्षण करतात. हे अँटिऑक्सिडंट इंफ्लामेशन कमी करून हृदयरोगांपासून संरक्षण करतात.

जांभूळ खाण्याचे फायदे

जांभूळ अनेक गुणांनी परिपूर्ण आहे. याचा वापर शरीराला बाहेरून आणि अंतर्गत दोन्ही प्रकारे शुद्ध करण्यासाठी केला जाऊ शकतो. बेरीमध्ये लोह, कॅल्शियम, प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. जांभूळ हे फक्त फळच नाही तर त्याच्या झाडाची साल, पाने आणि बियाही खूप फायदेशीर आहेत. त्याचे इतर फायदे..

पचनक्रिया सुरळीत होणे

हेल्दी स्किन

निरोगी केस

चांगले रक्त परिसंचरण

ब्लड शुगर नियंत्रित करण्यास मदत

किडनीस्टोनपासून आराम 

टॅग्स : मधुमेहहेल्थ टिप्स