ऋतू कोणताही असो, नियमितपणे दही खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं (Curd). दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, राइबोफ्लेविन, व्हिटामिन बी ६ आणि व्हिटामिन बी१२ या पोषक घटकांचे प्रमाण अधिक असते (Monsoon). या पौष्टीक घटकांमुळे शरीराला फायदेच फायदे मिळतात (Health Tips).
दही खाल्ल्यामुळे शरीरातील समस्या दूर व्हायला मोठी मदत मिळते. पण बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो, दही नेमकं कधी खावे? पावसाळ्यात दही खावे का? कोणत्या वेळेत दही खाल्ल्याने आरोग्याला जास्त फायदे मिळतील? फक्त दही खावे की त्यात काही मिसळावे?(This is the right way to consume curd during monsoons).
दुपारी दही खाण्याचे फायदे
वजन कमी करण्यास मदत
टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटनुसार, 'दुपारी दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे वजन घटवण्यास मदत मिळते. दही कॉर्टिसोल किंवा स्टिरॉइड हार्मोन्सचे उत्पादन कमी करते, ज्यामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होतो. शिवाय पोट भरल्यासारखे वाटते.
रणवीर सिंह वाढवतोय १५ किलो वजन, तुमचं वजनच वाढत नसेल तर पाहा ‘त्याचं’ डाएट
पचनसंस्था होते मजबूत
दही पचनसंस्थेसाठी अतिशय उपयुक्त असते. नियमत दही खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. दह्यामध्ये असलेल्या गुड बॅक्टेरियामुळे शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे पावसाळ्यात आवर्जून दही खा.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
दह्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. दह्यामध्ये गुड बॅक्टेरिया असतात जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात. यामुळेच रोज दही खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
लैंगिक संसर्गापासून संरक्षण
दही महिलांसाठी औषध म्हणूनही काम करते. याच्या सेवनाने लैंगिक संसर्गापासून सरंक्षण होते. दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया असल्यामुळे ते लैंगिक संसर्गाचा प्रसार रोखते.
उच्च रक्तदाब नियंत्रणात राहते
उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी दही हा उत्तम पर्याय आहे.दह्यामध्ये असलेल्या मॅग्नेशियममध्ये उच्च रक्तदाब लवकर नियंत्रित करण्याची क्षमता असते. यामुळेच दुपारी दही खावे.
सद्गुरू सांगतात, कुळीथ डाळ आणि उकडलेले शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे; मिळेल ताकद इतकी की..
हाडं होतात मजबूत
दह्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे दही खाल्ल्याने हाडे मजबूत होतात. यासह दातही निरोगी आणि मजबूत राहण्यास मदत मिळते.