दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. ऋतू कोणताही असो, काही जण बाराही महिने दही खातात (Curd). दही खाल्ल्याने पोट थंड राहण्यास मदत होते. यामध्ये असलेले कॅल्शियम आपले दात आणि हाडे मजबूत ठेवतात (Health tips). शिवाय स्नायू देखील बळकट होतात. दह्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात (Monsoon). त्यात लॅक्टोज, लोह आणि फॉस्फरस देखील असतात. ज्याचा आपल्या शरीरातील आवश्यक पोषकतत्त्वांमध्ये समावेश होतो.
काही जण नुसतंच दही खातात. पण फक्त दही किंवा त्यात साखर आणि मीठ घालून खाण्यापेक्षा त्यात स्वयंपाकघरातल्या ४ गोष्टी मिसळा. आरोग्याला बरेच फायदे मिळतील(This is the right way to consume curd during monsoons, mix 4 things in it).
दह्यात कोणत्या ४ गोष्टी मिसळून खाव्यात?
दही आणि जिरे
जर आपल्याला पचनाची समस्या असल्यास दह्यात जिरे पावडर मिसळून खा. यातून आपल्याला दोन फायदे होतील. यामुळे दही चवीला भन्नाट लागेल, आणि पचनही सुधारेल. याशिवाय उलट्या, पोटदुखी आणि मळमळ यांसारख्या त्रासापासून सुटका होईल. पोटाचे विकार दूर करण्यासाठी दह्यात जिरे पावडर घालून खा.
इवल्याश्या बियांतून मिळते भरपूर पोषण; कॅल्शियमचा आहे खजिना, वाढेल ताकद - दिसाल फिट
दही आणि काळी मिरी
वजन कमी करण्यासाठी दही किती फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहिती आहे. कमी वेळात वजन कमी करायचे असेल तर, दह्यात काळी मिरी पावडर घालून खा. यामुळे भुकेवर नियंत्रण राहील.
दही आणि मध
मध आणि दह्याचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि विविध आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते. मध आणि दही यांचे मिश्रण निरोगी त्वचा राखण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. दही हे नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. कारण त्यातील लॅक्टिक ऍसिडचे प्रमाण त्वचेला हायड्रेट ठेवते.
पोट साफच होत नाही, जोर लावावा लागतो? कॉफीत २ गोष्टी मिसळून प्या, सकाळी पोट होईल साफ
ड्रायफ्रुट्स आणि दही
जर वयानुसार हाडं कमकुवत असतील तर, दह्यासोबत ड्रायफ्रुट्स मिसळून खा. आपण त्यात काजू, बदाम, अक्रोड, बेदाणे आणि अंजीर घालून खाऊ शकता. ड्रायफ्रुट्समधील पौष्टीक घटक शरीर आणि हाडांना फायदा होईल.