Join us   

साखर खाणंच बंद केलं तर? महिनाभरात तब्येतीत दिसतील ५ बदल, करुन तर पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2023 2:29 PM

This is what happens when you stop eating sugar महिनाभर साखर खाल्लीच नाही तर तब्येतीत काय फरक पडतो?

आपण जे काही पदार्थ खातो, त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम शरीरात दिसून येतात. तज्ज्ञ कोणतीही गोष्ट मर्यादित प्रमाणात खाण्याचा सल्ला देतात. कारण प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्यास आरोग्याला हानी पोहचू शकते. मग ती फळं असोत, भाज्या, मीठ, साखर, किंवा इतर पदार्थ. काहींना गोड पदार्थ खायला खूप आवडते. परंतु, गोड पदार्थ म्हटलं की त्यात साखर आलीच. मात्र, अतिप्रमाणात साखर खाणे, आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

पण आपण कधी विचार केला आहे का, की महिनाभर साखर सोडल्याने शरीरात कोणते बदल घडतात? एका दिवसात कितीप्रमाणात साखर खायला हवी? यासंदर्भात, फोर्टिस हॉस्पिटलचे क्लिनिकल आहारतज्ज्ञ सुमैया यांनी साखर सोडण्याचे फायदे सांगितले आहेत(This is what happens when you stop eating sugar).

साखर सोडल्याने कोणते बदल घडतात?

आहारतज्ज्ञांच्या मते, ''साखर सोडण्याचे नुकसान कमी, फायदे जास्त आहेत. साखरेमध्ये कॅलरीज जास्त असतात. साखर सोडल्यामुळे मधुमेह, लठ्ठपणा इत्यादी समस्या कमी होऊ शकतात. जर आपल्याला डायबिटिज किंवा हृदयाच्या निगडीत समस्या असतील तर, साखर खाणे टाळा. काहींना गोड खाण्याची सवयी लागते, ही सवय मोडण्यासाठी आपण एक महिना साखर सोडून पाहू शकता.''

वजन कमी करायचं म्हणून आवडता भात बंद? भात कुणी आणि किती खाल्ला तर वजन हमखास कमी होते

साखर सोडल्याने आरोग्यावर कोणते परिणाम दिसून येतात?

रिफाइंड व्हाईट साखर आरोग्यासाठी घातक ठरू शकते. जर आपण कायमस्वरूपी साखर सोडत असाल तर, आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतात. एक महिना साखर सोडल्याने, वेट लॉस, तोंडाचे आरोग्य सुधारणे, स्किन क्लिअर दिसणे, हृदयामधील रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होणे, टाइप २ डायबिटिजचा धोका कमी होणे. यासह इन्शुलिनचा स्तर नॉर्मल करण्यासाठी याचा फायदा अधिक होतो.

हे पदार्थ खाणे टाळा

आपण साखर डायरेक्ट तरी खात नाही, परंतु, चहा, कॉफी, मिठाई, कोल्डड्रिंक्स इत्यादींमध्ये साखरेचा वापर होतोच. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळा. जर आपल्याला गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर, आपण खजूर, फळे हे पदार्थ खाऊ शकता. यामधून आपल्याला नैसर्गिक गोडवा मिळतो. याशिवाय आपण मध आणि गुळ देखील खाऊ शकता. परंतु, हे पदार्थ देखील मर्यादित प्रमाणात खायला हवे.

रात्रीच्या जेवणानंतर चुकूनही करू नका ३ गोष्टी, वजन वाढेल - आजारही छळतील

एका दिवसात किती प्रमाणात साखर खायला हवी?

जर आपल्याला गोड पदार्थ खूप आवडत असतील तर, एका दिवसात फक्त २ ते ३ चमचे साखर खावी. यापेक्षा जास्त खाणे टाळावे. परंतु ज्यांना मधुमेह, हृदयाच्या सबंधित समस्या, मूत्रपिंडाचा त्रास, किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे, त्यांनी आपल्या आहारातून साखर वगळावी. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य