सकाळ होताच आपली आई नाश्ता म्हणून चहा-चपाती देते. सकाळी पोहे, उपमा किंवा इतर पदार्थ तयार नसतील तर, आपण चहा-चपाती खातो. बरेच जण चहासोबत चपाती खातात. गरमागरम चहासोबत चपाती अप्रतिम लागते. शिवाय लंचपर्यंत आपल्याला भूकही लागत नाही (Health Care). पण आरोग्याच्या दृष्टीने चहा-चपाती खाणं योग्य आहे का? चहा-चपाती हे फूड कॉम्बिनेशन अनहेल्दी आहे का? यामुळे पोटाचे विकार यासह लठ्ठपणाची समस्या वाढतात का?(This is why 'Paratha with Tea' is a bad breakfast combination).
यासंदर्भात, बीएलके सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ सुनीता राय म्हणतात, 'नाश्त्यात चहासोबत चपाती खाणं आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक आहे. दोन्ही गोष्ट एकत्र खाल्ल्याने शरीराला पुरेसे पोषण मिळत नाही. सकाळी पौष्टीक आहार घ्यायला हवा. ज्यामुळे शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळेल. शिवाय त्यात पदार्थात प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम आणि आयर्न पुरेशा प्रमाणात हवे. पण चहा-चपाती खाल्ल्याने हे पोषक घटक आरोग्याला मिळत नाही.'
लसूण-दालचिनी-काळी मिरी- हाय बीपीचा त्रास असेल तर करा या तिघांशी दोस्ती, पाहा बदल
त्या पुढे म्हणतात, 'यासह कॅफिनयुक्त चहा पिऊन दिवसाची सुरुवात करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. खरं तर, कोणत्याही पदार्थासोबत चहा पिणे योग्य नाही. कारण चहासोबत चपाती खाताना शरीर लोह आणि कॅल्शियम शोषू शकत नाही. त्यामुळे या नाश्त्यातून आरोग्याला विशेष पौष्टीक घटक मिळत नाही. शिवाय चहामध्ये असलेल्या साखरेमुळे बरेच गंभीर आजारांची समस्या निर्माण होते.'
४ हिरवीगार पानं करतील बॅड कोलेस्टेरॉल कमी, न चुकता खा- हार्ट राहील ठणठणीत
हेल्दी नाश्ता म्हणजे काय?
जर आपल्याला झटपट पण आरोग्यदायी नाश्ता खायचा असेल तर, भाजी-चपाती, दही-चपाती, दूध किंवा चीज खाऊ शकता. किंवा कार्बोहायड्रेटयुक्त नाश्ता खाण्यासाठी आपण दलिया, उपमा किंवा अप्पम खाऊ शकता.