कोरोनाच्या काळात अनेक कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्यात आली. अजूनही अनेक कर्मचारी वर्क फ्राॅम होम करतात. यामुळे काम करणं अधिक सोयीचं झालं आहे, हे अगदी खरं. पण काम करताना कसं बसावं, कसं उठावं याची शिस्त मात्र पार बिघडली आहे. आपापल्या सोयीनुसार कोणी कुठेही कसंही लॅपटॉप घेऊन तासनतास बसत आहे. यामुळे शरीराची पार हेळसांड होत असून अनेक आजार डोकं वर काढत आहेत. अशा पद्धतीने पोटावर किंवा मांडीवर लॅपटॉप ठेवून अनेक तास काम केल्याने कोणत्या आजारांचा धोका वाढतो आहे, याविषयीची ही माहिती पाहा..
पोटावर, मांडीवर लॅपटॉप ठेवून काम केल्यास...
१. प्रजनन संस्थेसंबंधी आजार
याविषयी अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रोडक्टीव्ह मेडिसीन यांनी दिलेल्या माहितीनुसार सतत मांडीवर लॅपटॉप ठेवून काम केल्यामुळे प्रजनन क्षमतेवर विपरित परिणाम होत आहे.
‘तिची’ बॅटिंग पाहून युवराज सिंगही थक्क झाला, कोलकात्याच्या मुलीसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
आधीच बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेकांमध्ये फर्टिलिटीसंबंधित समस्या वाढलेल्या असताना अशा पद्धतीने लॅपटॉपच्या चुकीच्या वापरामुळे या समस्यांमध्ये आणखी भर पडत आहे.
२. त्वचेचे विकार
आपल्याल माहितीच आहे की लॅपटॉप जेव्हा सुरू असतो, तेव्हा त्याच्या खालच्या भागात असणाऱ्या जाळीतून गरम हवा बाहेर येत असते. या हवेच्या संपर्कात सतत आपली त्वचा येत असेल तर आपल्याला टोस्टेड स्किन सिंड्रोम हा आजार होऊ शकतो.
तुम्हीही पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाता का? आहारतज्ज्ञ सांगतात २ गोष्टींची काळजी घ्या, नाहीतर...
या आजारात त्वचेवर लालसर गुलाबी रंगाची रॅश येते. हळूहळू त्या भागाला खाज येण्याचं प्रमाणही वाढतं. याशिवाय लॅपटॉप मांडीवर घेऊन आपण सतत चुकीच्या अवस्थेत बसत असल्याने मान, पाठ, कंबर आणि गुडघेदुखीचा त्रासही मागे लागतो. त्यामुळे अशा पद्धतीने बसण्याची सवय लवकरात लवकर सोडा, असं तज्ज्ञ सांगतात.