Join us   

आहारात प्रथिने हवीत म्हणून झगडताय? पण खरंच प्रथिनांची गरज किती? तज्ज्ञ सांगतात ३ गैरसजुती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2023 9:32 AM

Three Misconceptions about Protein : आपल्या शरीराला खरंच प्रथिनांची किती प्रमाणात आवश्यकता असते आणि ती पुरेशा प्रमाणात आपल्याला मिळतात का याविषयी

प्रथिने हा आपल्या शरीराच्या बांधणीतील आणि पोषणातील महत्त्वाचा घटक असतो त्यामुळे आहारात प्रथिनांचा मोठ्या प्रमाणात समावेश करायला हवा असे आपण वारंवार ऐकतो. प्रथिनांमुळे हाडांचे कार्य, शरीराची वाढ, स्नायूंची बांधणी यांसाठी मदत होत असल्याने आहारात प्रथिने घ्यायला हवीत असे आपण वारंवार ऐकतो. त्यामुळे आपल्या नाश्त्यामध्ये आणि एकूणच आहारात प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याचे आपल्यावर ठसवले जाते. त्यादृष्टीने आपण अंडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांसाहारी पदार्थ यांचा समावेश करावा असा आपल्याला सांगण्यात येते. मात्र आपल्या शरीराला खरंच प्रथिनांची किती प्रमाणात आवश्यकता असते आणि ती पुरेशा प्रमाणात आपल्याला मिळतात का याविषयी समजून घेणे महत्त्वाचे आहे. याबाबत प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डिंपल जांगडा काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करतात. यामध्ये प्रथिनांबाबत त्या काय सांगतात पाहूया (Three Misconceptions about Protein)...

(Image : Google)

आपल्याला भरपूर प्रथिने खाण्याची आवश्यकता आहे यात म्हणावे तितके तथ्य नाही. फक्त गरोदर स्त्रिया आणि उंच वाढणाऱ्या मुलांना त्यांच्या आहारात भरपूर प्रथिनांची गरज असते कारण ते नवीन हाडे, स्नायू, ऊती, दात, नखे आणि केस तयार करत असतात. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या म्हणण्यानुसार, प्रौढ व्यक्तीसाठी दररोज 46 ते 56 ग्रॅमपेक्षा जास्त प्रथिनांची गरज नाही. परंतु एक सरासरी व्यक्ती दररोज 70 ते 100 ग्रॅम आणि त्याहून अधिक प्रथिने आहारातून घेतात. ज्यामुळे यकृत आणि मूत्रपिंडांवर जास्त काम करण्याचा ताण येतो. खरं तर, जे लोक दीर्घायुषी आहेत त्यांच्या आहारात अधिक भाज्या आणि फळे आणि धान्ये घेतात आणि खूप कमी प्रथिने घेतात. त्याऐवजी ते कर्बोदके जास्त प्रमाणात घेतात. 

प्रथिने ही फक्त प्राणीजन्य पदार्थांतून मिळतात हे खरे नाही, तर या पदार्थांमुळे फॅटस आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढते. ज्यामुळे हृदयरोग आणि कर्करोगाचा धोका वाढविण्याची शक्यता असते. त्याऐवजी, वनस्पती आधारित अन्न - मसूर, सोयाबीन, कडधान्ये, शेंगा यांचे 300 प्रकार आहेत, ज्यामुळे तुम्हाला आवश्यक असलेली सर्व प्रथिने मिळतात आणि फळे आणि भाज्यांमध्ये देखील प्रथिने असतात. त्याशिवाय नटस आणि बियांमध्ये प्रथिने असतात. तसेच अमिनो आम्ल वनस्पतींवर आधारित अन्नातून मिळत नाहीत हेही खरे नाही. तर काही पदार्थांच्या योग्य जोड्या केल्या तर त्याचा फायदा होतो.  तांदूळ आणि सोयाबीनचे वेगळे अमीनो अॅसिड प्रोफाइल आहेत, परंतु जेव्हा ते एकत्र खाल्ले तेव्हा ते तुम्हाला आवश्यक नऊ प्रकारचे अमीनो अॅसिड देते, जे तुमचे शरीर तयार करू शकत नाही. याशिवाय डॉ. डिंपल यांनी आपल्या कमेंट सेक्शनमध्ये शाकाहारी पदार्थांतून मिळणाऱ्या विविध घटकांची आणि पदार्थांची यादीही दिली आहे. त्यामुळे तुम्हाला याबद्दल जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांचा हा व्हिडिओ नक्कीच पाहू शकता. 

 

टॅग्स : आरोग्यआहार योजनाहेल्थ टिप्स