हिवाळ्यातली थंडी आता चांगलीच जाणवायला लागली आहे. त्यामुळे वातावरणातल्या गारव्यामुळे सर्दी, खोकला, नाक गळणं, घसा खवखवणं हा त्रास असणारे लोक घरोघरी दिसू लागले आहेत. तसंही बऱ्याचदा वातावरणात बदल झाला की सर्दी- खोकल्याचा त्रास अनेक जणांना होतो. सर्दी- खोकला सुरू झाला की बरेच लोक काही चुका करतात. यामुळे दुखणं तर कमी होतं, पण त्याचे आरोग्यावर वेगळेच परिणाम होतात. कधी कधी या चुकांमुळे आजारपण गरजेपेक्षा जास्त वाढत जातं (Three mistakes to avoid when you have a cold or a sinus attack). यामुळे सर्दी झाल्यावर कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी टाळाव्या याविषयी डॉक्टरांनी सांगितलेली ही माहिती एकदा वाचायलाच पाहिजे.(how to get relief from cold and cough?)
सर्दी झाल्यावर कोणत्या गोष्टी करू नये?
सर्दी झाल्यावर कोणत्या गोष्टी करू नयेत, याविषयीची माहिती डॉक्टरांनी dimplejangdaofficial या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेल्या ३ गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहा..
चेहऱ्यावर बारीक खड्डे दिसतात- पिंपल्सही खूप वाढले? 'हा' घरगुती उपाय करा- चेहरा होईल स्वच्छ
१. लगेचच गोळ्या- औषधी घेणे
आपल्याला सर्दी होणार अशी चिन्हं दिसू लागली की लगेचच काही जण गोळ्या- औषधी घेऊन सर्दी दाबून टाकतात. पण असं करणं चुकीचं आहे. सर्दीमुळे आपल्या शरीरात जो म्युकस तयार झाला आहे, तो शरीराबाहेर पडणं गरजेचं आहे. कारण कोणत्यातरी ॲलर्जीमुळे, दुषित पदार्थ शरीरात गेल्यामुळे सर्दी होते आणि म्युकसच्या माध्यमातून ते घटक शरीराबाहेर पडत असतात. त्यामुळे ही प्रक्रिया गोळ्या घेऊन बंद करून टाकू नका, असं डॉक्टर सांगतात.
२. वाफ न घेणे
सर्दी झाल्यावर वाफ घ्यायला अनेकजण कंटाळा करतात. पण वाफ घेणं खूप गरजेचं आहे.
Gardening: कुंडीतले रोपंही देईल किलोभर कांदे- बाल्कनीतल्या कुंडीत कांदे लावण्यासाठी खास टिप्स
कारण वाफ घेतल्यामुळे नाक, घसा या भागात साचलेला कफ, म्युकस मोकळा होण्यास मदत होते. त्यामुळे सर्दी झाल्यावर वाफ घेण्याचा कंटाळा करू नका.
३. मध घेण्याची चुकीची पद्धत
अनेकजण सर्दी झाल्यावर गरम पाण्यात मध टाकून पितात. पण ही चुकीची पद्धत आहे. सर्दी झाल्यावर आवर्जून मध खा. कारण तो सर्दी- खोकला बरा करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
बारीक दिसण्यासाठी ब्लाऊजची निवड कशी करावी? ३ सोप्या टिप्स, जास्त आकर्षक- स्मार्ट दिसाल
पण तो पाण्यात टाकून पिऊ नका. त्याऐवजी एका चमच्यामध्ये मध घ्या. त्यामध्ये मीरेपूड, हळद, दालचिनी टाकून तो तसाच चाटून घ्या. या पद्धतीने मध घेतल्यास लवकर आराम मिळेल.