फळं ही नुसती खायला हवीत. फळे दूध, दही, चीज किंवा इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये मिसळल्यास ते विषारी होतात जे आतड्यांसाठी चांगले नसते. तसेच, फळे भाज्या, आणि धान्ये किंवा अगदी तुमच्या ओटमीलसोबतही खाऊ नयेत. यामुळे पचनक्रिया संथ होते. कारण, फळांना पचन, शोषण, निर्मूलनासाठी पोटात 1 तास लागतो. तसेच लहान आतड्यात 1 तास आणि मोठ्या आतड्यात 1 तास लागतो. भाज्यांचे पचन, शोषण आणि पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी पोटात अंदाजे 2 तास, लहान आतड्यात 2 तास आणि मोठ्या आतड्यात 2 तास लागतात. धान्य आणि कडधान्यांसाठी अंदाजे 18 तास लागतात - पोटात 6 तास, लहान आतड्यात 6 तास आणि मोठ्या आतड्यात 6 तास (Three simple rules to follow when eating fruits).
आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डिंपल जांगडा याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात, जेव्हा तुम्ही फळे भाज्या आणि धान्यांमध्ये मिसळता, ज्यांना पचायला, शोषून घेण्यासाठी 2 ते 16 तास (तुमच्या पोटात आणि आतड्यांमध्ये) लागतात, तेव्हा ते पचलेले फळ न पचलेल्या भाज्या आणि धान्यांना लहान आतड्यात ढकलतात, जे फुगणे, गॅसेस, आतड्यात हे अन्न एकप्रकारे सडते, जे योग्य नाही. म्हणून फळे इतर कोणत्याही पदार्थासोबत खाता नुसतीच खायला हवीत.
अनेकांना जेवणानंतर गोड खावेसे वाटते म्हणून हे लोक फळं खातात. मात्र दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर फळे खाऊ नका. यामुळे न पचलेले जेवण पुन्हा लहान आतड्यात ढकलले जाईल आणि तुमच्या पचन प्रक्रियेला विलंब होईल. तसेच सूर्यास्तानंतरही फळे खाऊ नका. काही लोकांना याची सवय झाली आहे, परंतु ते आरोग्यदायी नाही, कारण फळांमध्ये सक्रिय फळ एन्झाइम असतात जे मेलाटोनिनला अवरोधित करतात, जे तुमच्या शरीरावर जागृत होण्याचा परिणाम करतात आणि तुमच्या झोपेच्या चक्रावर परिणाम करू शकतात. सकाळी नाश्त्याच्या एक तास आधी किंवा नाश्ता केल्यानंतर दोन तासांनी किंवा तुम्हाला आवडत असल्यास सूर्यास्तापूर्वी फळ खायला हवे.