वै. पद्मा जगदीशजी तोष्णीवाल
दिवाळीच्या अगदी महिनाभर आधीच अनेक महिला घराच्या साफसफाईला सुरुवात करतात. त्यानंतर फराळांचे विविध पदार्थ बनविण्याची लगबग सुरू होते. दिवाळी तर उत्साहात साजरी होते, पण ही सगळी धावपळ, धुळीतली कामं, रोजचं तळणं यामुळे आरोग्यावर मात्र परिणाम होतो आणि तो त्रास मग दिवाळीनंतर जाणवतो. म्हणूनच दिवाळी दरम्यान व दिवाळीच्या नंतरही आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी या काही गोष्टींकडे लक्ष द्या.
साफसफाई- फराळाचं तळणं यामुळे त्रास होऊ नये म्हणून...
१. साफसफाईची कामं करताना उडणाऱ्या धुळीमुळे एलर्जी, सर्दी, दमा यासारखे आजार बळावू शकतात. त्यासाठी आयुर्वेदीक नस्य तेलाचे एक- दोन थेंब काम सुरू करण्यापूर्वी दोन्ही नाकपुड्यांमध्ये टाकावे. औषधीयुक्त तेल नसेल तर घरात असलेले खोबरेल तेल बोटाने नाकपुड्याच्या आतून लावावे. यामुळे धुळीचे कण फुफ्फुसात जाऊ शकत नाहीत.
ऋतिक रोशन खातो त्या हेल्दी पिझ्झाची रेसिपी, ऋतिक म्हणतो, चव इतकी भारी की..
२. धुळीचे काम झाल्यावर कपालभाती या प्राणायामाने पण लाभ मिळतो. पण प्राणायाम करण्याच्या ४ ते ५ तास आधी तुम्ही काही खाल्लेलं नसावं.
३. दिवाळी फराळात तेलकट, तुपकट व गोड पदार्थ भरपूर असतात. हे पदार्थ जड असल्याने अपचन, आम्लपित्त असा त्रास होतो. त्यासाठी घरगुती उपाय म्हणून भरपूर पाणी प्यावे. जर पाणी कोमट करून घेतले तर अधिक चांगले. तसेच रात्री उशीरा असे पदार्थ खाणे टाळावे.
बसल्या- बसल्या वेटलॉस करण्याचा सोपा मार्ग, हाताचे प्रेशर पॉईंट्स दाबा आणि पहा बदल
४. पंचकर्मदेखील निश्चितच फायद्याचे ठरते. स्नेहन-स्वेदन, बस्ती, विरेचन, वमन, नस्य व रक्तमोक्षण यांचा पंचकर्मात समावेश होतो. शरीर शुध्दी म्हणजेच बॉडी डिटॅाक्सीफिकेशनसाठी हे सगळे उपाय नक्कीच मदत करतात. “पहला सुख निरोगी काया” या उक्तीप्रमाणे आरोग्य सांभाळा व स्वास्थ्य टिकवून ठेवण्याचे उपाय अंमलात आणून शतायुषी व्हा.
साफसफाई करून दिवाळीसाठी घर जसं चकाचकीत केलं, तसंच दिवाळीनंतर लंघन व वैद्यांच्या सल्ल्यानुसार पंचकर्म करून शरीराची पण शुध्दी करून घ्या.
(लेखिका आयुर्वेद सोल्युशन्स व केरळीयन पंचकर्म सेंटर, औरंगाबाद येथे आयुर्वेदतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)