Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तुमच्याही हाता-पायांना सारख्या मुंग्या येतात? 'या' व्हिटॅमिनची कमतरता, 5 सोपे उपाय...

तुमच्याही हाता-पायांना सारख्या मुंग्या येतात? 'या' व्हिटॅमिनची कमतरता, 5 सोपे उपाय...

Tingling and Sensation in Feet and Hands : एकदा मुंग्या आल्या की हात किंवा पाय इतके बधीर होतात की काय करावे ते समजत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2022 09:48 AM2022-11-24T09:48:02+5:302022-11-24T09:50:01+5:30

Tingling and Sensation in Feet and Hands : एकदा मुंग्या आल्या की हात किंवा पाय इतके बधीर होतात की काय करावे ते समजत नाही.

Tingling and Sensation in Feet and Hands : Do you get the same tingles on your hands and feet? 'This' vitamin may be deficient, take 5 simple remedies... | तुमच्याही हाता-पायांना सारख्या मुंग्या येतात? 'या' व्हिटॅमिनची कमतरता, 5 सोपे उपाय...

तुमच्याही हाता-पायांना सारख्या मुंग्या येतात? 'या' व्हिटॅमिनची कमतरता, 5 सोपे उपाय...

Highlightsआपण घालत असलेले शूज जास्त घट्ट असतील तरीही मुंग्या येण्याची शक्यता असते त्यामुळे शूज तपासावेत. हाता-पायांना मुंग्या आल्या तर त्यांची हालचाल करावी म्हणजे त्यावरील प्रेशर कमी होते आणि हालचाल झाल्याने मुंग्या कमी होण्यास मदत होते.

हातापायांना मुंग्या येणे ही अगदीच सामान्य गोष्ट आहे. कधी एकाच अवस्थेत बराच काळ बसल्यामुळे किंवा आणखी काही कारणाने आपल्याला मुंग्या येतात. पण त्याकडे आपण फारसे लक्ष न देता अवघडले असेल असे म्हणून दुर्लक्ष करतो. काही वेळाने या मुंग्या जातातही त्यामुळे हे फारसे काही गंभीर नाही असे आपल्याला वाटते. मात्र हातापायाला मुंग्या येण्यामागे व्हिटॅमिन्सची कमतरता, डायबिटीस, कोलेस्टेरॉल वाढणे अशी अनेक कारणे असू शकातात. आपल्याला याबाबत माहिती नसल्याने केवळ अवघडले असेल म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन ई ची कमतरता हे अनेकदा हातापायांना मुंग्या येण्यामागचे मुख्य कारण असते. एकदा मुंग्या आल्या की हात किंवा पाय इतके बधीर होतात की काय करावे ते समजत नाही. आता ही समस्या दूर करायची तर आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा तसेच मुंग्या आल्यावर लगेचच काय करावे यासंबंधी माहिती करुन घेणे गरजेचे आहे (Tingling and Sensation in Feet and Hands). 

(Image : Google)
(Image : Google)

१. ज्यांना सतत हातापायाला मुंग्या येतात त्यांनी आपल्या आहारात मोड आलेली कडधान्ये आणि व्हेज ऑईलचा समावेश करायला हवा. यामध्ये व्हिटॅमिन बी जास्त प्रमाणात असल्याने ते आरोग्यासाठी फायदेशीर असते.

२. सूर्यफुलाचे तेल आणि राजमा यामध्येही व्हिटॅमिन बी चांगल्या प्रमाणात असल्याने आहारात या पदार्थांचा समावेश केल्यास मुंग्या येण्याची समस्या कमी होऊ शकते. 

३. सुकामेवा विशेषत: बदामामध्ये व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात असल्याने आहारात सुकामेवा आवर्जून घ्यायला हवा. त्यामुळे व्हिटॅमिन ई ची कमतरता दूर होण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

४. हाता-पायांना मुंग्या आल्या तर त्यांची हालचाल करावी म्हणजे त्यावरील प्रेशर कमी होते आणि हालचाल झाल्याने मुंग्या कमी होण्यास मदत होते. तसेच थोडे चालल्यासही पायाला आलेल्या मुंग्या लवकर जातात.  

५. ज्याठिकाणी मुंग्या आल्या आहेत त्याठिकाणी गार पाणी टाकल्यास त्याचाही अतिशय चांगला फायदा होतो. आपण घालत असलेले शूज जास्त घट्ट असतील तरीही मुंग्या येण्याची शक्यता असते त्यामुळे शूज तपासावेत. 

Web Title: Tingling and Sensation in Feet and Hands : Do you get the same tingles on your hands and feet? 'This' vitamin may be deficient, take 5 simple remedies...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.