काही जणांची तब्येत अशी असते की त्यांना वारंवार ॲसिडीटीचा त्रास होतो. खाण्याच्या वेळा चुकल्या, खाण्यापिण्यात एखादा पदार्थ कमी जास्त झाला, जागरण झालं की अनेकांना लगेच ॲसिडीटी होते. यामध्ये महिलांचं प्रमाण तर जरा जास्तच आहे. बऱ्याच महिलांचं ॲसिडीटी वाढल्यामुळे कायम डोकं दुखत असतं. त्याचबरोबर असेही बरेच जण आहेत ज्यांना नेहमीच पोट फुगल्यासारखं, गच्च झाल्यासारखं वाटतं (Home Remedies For Bloating, Acidity & Gastritis). असा दोन्ही प्रकारचा त्रास ज्यांना असेल त्यांच्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेले पुढील २ उपाय अतिशय फायद्याचे ठरतील. (how to reduce Bloating, Acidity & Gastritis problems)
ॲसिडीटी, पोट फुगणे- गच्च होणे अशा त्रासांसाठी उपाय
ॲसिडीटी, पोट फुगणे असा त्रास वारंवार होत असेल तर त्यासाठी आहारात कोणते पदार्थ टाळावेत आणि कोणते घ्यावेत, याविषयीची माहिती डॉक्टरांनी baksonsofficial या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
देसी गर्ल प्रियांका चोप्राची २ वर्षांची चिमुकली लाटतेय पोळ्या, आणि तिची आजी.... बघा व्हायरल फोटो
१. वारंवार पोट गच्च होत होत असेल तर..
पोट फुगल्यासारखं वाटणे किंवा गच्च होणे असा त्रास अनेकांना होतो. यालाच आपण ब्लोटिंग असंही म्हणताे. ज्या लोकांना असा त्रास वारंवार होतो त्यांनी ग्लूटेन असणारे पदार्थ आहारात खूप कमी घ्यावेत. म्हणजेच मैदा आणि गव्हापासून तयार झालेले पदार्थ खाणे टाळावे. कारण ते पदार्थ पचायला खूप जड असतात. त्याऐवजी ज्वारी, बाजरी किंवा मिश्र धान्यांच्या भाकरी खाव्या.
२. ॲसिडीटी होत असल्यास घरगुती उपाय
ज्या लोकांना वारंवार ॲसिडीटी होते, करपट ढेकर आल्यासारखं होतं, तोंडात आंबट पाणी येतं, अशा लोकांनी सिमला मिरची कमी प्रमाणात खावी.
जागतिक स्तनपान सप्ताह: आईला पुरेसं दूध येत नसेल तर काय करावं? आहारतज्ज्ञ सांगतात ५ उपाय
तसेच खूप तिखट, आंबट पदार्थ खाऊ नयेत. तसेच एकाच वेळी खूप पोटभरही जेवू नये. थोड्या थोड्या वेळाने थोडं थोडं खावं. असं केल्याने ॲसिडीटी, अपचन, खूप ढेकर येणं असे त्रास होणार नाहीत.