Join us   

सद्गगुरू सांगतात जेवताना कसं, किती खावं याचे ५ नियम; वजन कंट्रोलमध्ये राहील-आजारही दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 2:01 PM

Tips for Eating Healthy : जेवताना कसं, किती आणि कधी खावं याच्या सोप्या टिप्स सद्गुरू जग्गी वासुदेव  यांनी सांगितल्या आहेत.

जर तुमचं पोट आणि पचनक्रिया चांगली असेल तर  तब्येत चांगली राहण्यास मदत होते. (Health Tips) हेल्दी खाण्यापिण्याच्या सवयी आपल्या आहाराचा मुख्य भाग आहेत. आहाराचे बेसिक नियम प्राचीन काळापासून प्रचलित असूनही वेळेनुसार लोक विसरले आहेत.  जेवताना कसं, किती आणि कधी खावं याच्या सोप्या टिप्स सद्गुरू जग्गी वासुदेव  (Sadhguru jaggi vasudev)यांनी सांगितल्या आहेत. (Sadguru tells 5 rules of how and how much to eat while eating)

१) रोज २ वेळा जेवण करा

जगभरात OMAD डाएट फार प्रसिद्ध आहे. यात दिवसभरात फक्त एकदा खाण्याचा सल्ला दिला जातो. वजन कमी करण्याची ही पद्धत प्रभावी असल्याचे मानले जाते. पण दिवसभरात २ वेळा जेवल्याने गंभीर आजारांपासून बचाव होऊ शकतो. पहिलं जेवण १०  वाजता आणि दुसरं ७ वाजता असायला हवं. 

२) हाताने जेवा

आजकाल लोक वेस्टर्न कल्चर फॉलो करण्याच्या प्रयत्नात असतात. सद्गुरूंच्या मते जेवणाला जोपर्यंत तुम्ही स्पर्श करत नाही तोपर्यंत  जेवण काय आहे ते तुम्हाला कळत नाही. काटा चमच्याने खाणं सेफ मानलं जात असलं तरी हाताने खाल्लेलं अधिक फायदेशीर ठरतं.  यासाठी  साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवून मगच जेवायला बसा.

3) जेवल्यानंतर आभार 

जेवताना आपण प्रशंसा आणि आभार मानायला विसरतो. आपण हेच विसरून जातो की भाज्या, अन्न कोणत्या पद्धतीने आपल्या ताटात आले आहे. सद्गुरू सांगतात की झाडं, फुलं, तुम्ही जे काही खातात ते सजिव असतात. त्यांच्याकडून मिळालेले अन्न खाताना धन्यवाद करायला विसरू नका. 

हिवाळ्यात करा मऊ-पौष्टीक ज्वारीची खिचडी; पचायला हलकी-करायला सोपी, खा गरमागरम खिचडी

4)  अन्न व्यवस्थित चावून खा

अन्न नेहमी व्यवस्थित चावून खायला हवं. जेवणाचे 24 भाग करून अन्न 24 वेळा चावून खा. यामुळे डायजेशन सुधारण्यास मदत होईल. आयुर्वेदानसार अन्न व्यवस्थित चावून खायला हवं. यामुळे शरीराला चांगले पोषण मिळते. 

हाडांना भरपूर कॅल्शियम देतात ४ पदार्थ-रोज खा; हाडांच्या बळकटीसाठी रामदेव बाबांचा खास सल्ला

5) जेवताना किती खाता, काय खाता याकडे लक्ष द्या

अनेकदा स्ट्रेसमध्ये असताना किंवा घाईत असताना तुम्ही जास्त खाता किंवा कोणता पदार्थ खाताय याकडे लक्ष देत नाही. वेळेवर खाणं फार महत्वाचे असते. माईंडफूल इटिंगमुळे इम्यून सिस्टिम मजबूत होण्यास मदत होते. जे रोजच्या कामकाजासाठी आवश्यक असते. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स