आजकाल लोक निरोगी राहण्यासाठी हेल्दी डाएट घेतात (Healthy Eating). पण जेवताना त्यांच्याकडून छोट्या-छोट्या चुका होतात. जेवताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या नाहीत तर आहाराचा पुरेपूर फायदा शरीराला मिळत नाही (Eating Tips). आरोग्य तज्ज्ञांच्या मते अन्न खाण्याच्या योग्य पद्धतीला माइंडफुल इटिंग म्हणतात. पौष्टिक आहार योग्य प्रकारे आणि वेळेवर खाल्ल्यास आपण दीर्घायुष्यासाठी निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकता.
यासंदर्भात, आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा सांगतात, 'आजकाल लोक जेवताना स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा टीव्ही बघत जेवतात. ज्यामुळे आपले जेवणावर संपूर्ण लक्ष केंद्रित नसते. याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर तर होतोच, यासह शरीराला योग्य पोषण मिळत नाही. माइंडफुल इटिंग करायला हवे. यामध्ये जेवताना फक्त अन्नावर लक्ष केंद्रित करता येईल. याचा थेट परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होईल'(Tips for Eating Healthy – How, When and What to Eat).
माइंडफुल इटिंगचे फायदे
आहारतज्ज्ञांच्या मते, बऱ्याच लोकांना आपण किती प्रमाणात काय खात आहोत याची कल्पना नसते. त्यामुळे खाताना नेहमी खाण्याकडे लक्ष केंद्रित ठेवा. यामुळे आपण आपल्या भुकेनुसार खातो, आणि हळू जेवतो. सावकाश आणि काळजीपूर्वक खाल्ल्याने अन्नाचे पचन चांगले होते.
मोड आलेल्या कडधान्यांचा कुबट वास येतो? ५ टिप्स; कडधान्य राहतील फ्रेश - मोडही येतील सुरेख
जेवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
- जेवताना अन्नावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा. मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही पाहू नका. शक्यतो गॅजेट्सपासून दूर राहा.
- अन्न हळूहळू आणि पूर्णपणे चावून खा. अति खाणं टाळा. जेवताना अन्नाचा आनंद घ्या.
पार्लरला जायला वेळच नाही? १० रुपयात फेशिअल करा घरीच; गणेश उत्सवात दिसाल मोहक
- आपल्या आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करा. यामुळे शरीराला पुरेपूर पोषण मिळेल.
- अन्नाशी भावनिकरित्या कनेक्ट व्हा. आपल्या कुटुंबासह शांत आणि आनंददायी वातावरणात अन्न खा.