Join us   

कामानिमित्त सारखा प्रवास करावा लागतोय? आहारतज्ज्ञ सांगतात, प्रवासात आरोग्याची काळजी घेण्याच्या ६ टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2022 2:22 PM

Tips For Frequent Traveler : प्रवासातही काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष दिल्यास तब्येच चांगली राहण्यास मदत होते.

ठळक मुद्दे प्रवासात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याने काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवेवेगवेगळ्या कारणांनी सतत प्रवास करावा लागत असेल तर आरोग्याची हेळसांड होऊ शकते..

ऑफीसच्या कामानिमित्त किंवा आणखी काही कारणाने अनेकांना सातत्याने प्रवास करावा लागतो. कधी ट्रीप म्हणून तर कधी आणखी काही कारणाने सलग प्रवास होत असल्यास आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. सध्या ख्रिसमस किंवा न्यू इयर म्हणजे सगळीकडे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. या काळात शाळा-कॉलेजला सुट्ट्या असल्याने घरोघरी फिरायला जायचे प्लॅन होतात. कधी आपण जवळपासच एखादी लहान टूर प्लॅन करतो तर कधी आपल्याल कामानिमित्ता दुसऱ्या राज्यात किंवा देशातही जावे लागते. प्रवास म्हटल्यावर आपण ज्याठिकाणी जातो त्याठिकाणचे फूड एक्सप्लोअर करण्याचा आपला प्लॅन असतो. ट्रॅव्हलिंगच्या दृष्टीने असे करणे जास्त चांगलेही असते (Tips For Frequent Traveler). 

मात्र सतत प्रवास होत असेल आणि जास्त प्रमाणात बाहेरचे खाणे होत असेल तर आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते. अशावेळी प्रवासातही काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष दिल्यास तब्येच चांगली राहण्यास मदत होते. अशावेळी आपण सोबत काय ठेवायला हवं, प्रवास करताना कोणत्या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवं याबाबत आपण म्हणावे तितके जागरुक असतोच असं नाही. प्रसिद्ध सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर प्रवासाला जाताना सोबत काय घ्यायला हवं, आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं याविषयीच्या काही महत्त्वाच्या टिप्स आपल्यासोबत शेअर करतात. यामध्ये त्या काय सांगतात पाहूया...

(Image : Google)

१. प्रवासाला जाताना तुमच्याजवळ पाण्याची बाटली अवश्य असायला हवी. प्रवासात भरपूर पाणी प्या. अनेकदा वॉशरुमला जावे लागेल म्हणून आपण पाणी पिणे टाळतो. पण असे न करता प्रवासात दर थोडा वेळाने घोट घोट पाणी प्यायला हवे. 

२. बरेचदा आपल्याला प्रवासात चहा किंवा कॉफी घेण्याची  सवय असते. पण तुम्ही विमानाने किंवा रोडने प्रवास करणार असाल तर प्रवास सुरू करण्याच्या आधी आणि नंतर चहा-कॉफी घेणे टाळा. नाहीतर बऱ्याचदा आपल्याला मळमळण्याचा त्रास होण्याची शक्यता असते. 

३. ज्या हॉटेलमध्ये जीम फॅसिलीटी आहे असे हॉटेल निवडा. तसेच हॉटेलवाल्यांना योगा मॅट आवर्जून मागा. जवळच्या अंतरावर जाणार असाल तर तुमची योगा मॅट जवळ ठेवायला विसरु नका. प्रवासात असलात तरी किमान ५ सूर्यनमस्कार तरी घालायलाच हवेत.

४. झोपताना किमान ५ मिनीटांसाठी सुप्तबद्धकोनासन आवर्जून करा. 

५. हॉटेलमधून बाहेर पडायच्या पुरेसे आधी दाल खिचडी, डाळ भात, पास्ता असे काही ना काही ऑर्डर करुन ठेवा आणि खाऊनच पुढच्या प्रवासाला निघा. 

६. आपल्यासोबत दाणे, काजू, पिस्ता असे काही ना काही असायला हवे. जेणेकरुन दोन प्रवासांच्या मध्ये, मिटींग किंवा कॉन्फरन्सच्या मधे आपण ते सहज तोंडात घालू शकू. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स