Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Diabetes Control: १५ दिवसांत नाॅर्मल होईल ब्लड- शुगर लेव्हल, वाचा तज्ज्ञांनी सांगितलेल्या 8 टिप्स

Diabetes Control: १५ दिवसांत नाॅर्मल होईल ब्लड- शुगर लेव्हल, वाचा तज्ज्ञांनी सांगितलेल्या 8 टिप्स

How to Control Diabetes: रक्तातील साखरेचे प्रमाण (blood sugar level) कमी करून मधुमेह नियंत्रित ठेवायचा असेल तर या काही गोष्टी कटाक्षाने पाळा.. १५ दिवसांत वाढलेली शुगर (how to control sugar?) प्रमाणात येईल, असं सांगत आहेत आयुर्वेदतज्ज्ञ.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2022 08:00 AM2022-07-03T08:00:02+5:302022-07-03T08:05:01+5:30

How to Control Diabetes: रक्तातील साखरेचे प्रमाण (blood sugar level) कमी करून मधुमेह नियंत्रित ठेवायचा असेल तर या काही गोष्टी कटाक्षाने पाळा.. १५ दिवसांत वाढलेली शुगर (how to control sugar?) प्रमाणात येईल, असं सांगत आहेत आयुर्वेदतज्ज्ञ.

Tips to control blood sugar level, How to control blood sugar level, Diet and Exercise to control Diabetes | Diabetes Control: १५ दिवसांत नाॅर्मल होईल ब्लड- शुगर लेव्हल, वाचा तज्ज्ञांनी सांगितलेल्या 8 टिप्स

Diabetes Control: १५ दिवसांत नाॅर्मल होईल ब्लड- शुगर लेव्हल, वाचा तज्ज्ञांनी सांगितलेल्या 8 टिप्स

Highlightsअवघ्या काही दिवसांत ब्लड- शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये कशी आणायची, यासंबंधी काही टिप्स

मधुमेह (Diabetes) हा आजार आता खूपच कॉमन झाला आहे. प्रत्येक घरात या आजाराचा एक तरी रुग्ण असतोच. आजकाल तर बदलेली लाईफस्टाईल, फास्टफूड, बैठेकाम यामुळे तर कमी वयातच मधुमेह गाठत आहे. एकदा का हा आजार मागे लागला की मग रक्तातील साखरेचे चढ- उतार (changes in blood sugar level) कायम सुरूच असतात. काही जणांचा जेवणावर कंट्रोल राहत नाही आणि मग शुगर खूप जास्त (Tips to control blood sugar level) वाढून जाते. मधुमेह हा आजारच असा आहे की ज्यात डॉक्टरांच्या गोळ्या- औषधींसोबतच थोडी शिस्त पाळणंही गरजेचं आहे. म्हणूनच तर अवघ्या काही दिवसांत ब्लड- शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये कशी आणायची, यासंबंधी काही टिप्स देत आहेत डॉ. दिक्षा भावसार. (Diet and Exercise to control Diabetes)

 

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी खास टिप्स
असा असावा आहार (Diet for diabetes)

१. आवळा ज्युस आणि हळद एकत्र करून घ्यावा. तसेच भोपळ्याचं सूप आणि शेवग्याचं सूप एक दिवसाआड नाश्त्यामध्ये किंवा रात्रीच्या जेवणात घ्यावं. एक दिवसाआड घेणं शक्य नसेल तर आठवड्यातून दोन वेळा भोपळ्याचं सूप आणि दोन वेळा शेवग्याचं सूप अवश्य घ्यावं.
२. दही, तळलेले पदार्थ, आंबवलेले पदार्थ आणि मैद्याचे पदार्थ अतिशय कमी खावेत. त्याऐवजी बेसन, नाचणीचं पीठ, ज्वारीचं पीठ खाण्यास प्राधान्य द्यावे. 
३. दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर ५ ते ७ मिनिटे कटाक्षाने वज्रासनात बसावे.
४. पालक, मेथी, भोपळा, टोमॅटो, कारले, शेवगा या भाज्या तसेच जांभुळ, सफरचंद, आवळा, पपई, डाळिंब, किवी ही फळे अधिकाधिक प्रमाणात खावीत.
५. रात्रीच्या जेवण ८ वाजेच्या आधी व्हायला हवं. त्यानंतर साधारणपणे ३ तासांनी झोपावं. दुपारची झोप पुर्णपणे टाळावी. 

 

असा करावा व्यायाम (Exercise for diabetes)
१. डॉ. भावसार यांनी सांगितले आहे की रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी मंडुकासन, शशांकासन, भुजंगासन, बालासन, धनुरासन या योगासनांचा सराव नियमितपणे केला पाहिजे. तसेच यासोबतच कपालभाती, अनुलोम विलोम हे दोन प्राणायामही करावेत. दररोज ४५ मिनिटांचा व्यायाम करणे अतिशय गरजेचे आहे.
२. दररोज किमान ५००० पाऊलं तरी तुमचं चालणं झालंच पाहिजे. १० हजार स्टेप्सपर्यंत चालू शकलात, तर ते अधिक उत्तम असंही त्यांनी सांगितलं. 
३. सायकलिंग, कार्डिओ व्यायाम केले तरी उत्तम. व्यायाम शक्यतो सकाळी ९ वाजेच्या आधी सुर्यप्रकाशात केले तर त्याने अधिक फायदा होतो. 

 

Web Title: Tips to control blood sugar level, How to control blood sugar level, Diet and Exercise to control Diabetes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.