Join us   

नसांमधलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात पेरूची पानं; असा करा वापर, हृदयाचे गंभीर आजार टळतील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 8:34 AM

Tips to Cut Your Cholesterol Fast : पेरूच्या पानांचा रस रक्तातील साखरेची पातळी सुधारतो. तुम्ही डायबिटीसचे रुग्ण असाल तर तुम्ही नियमितपणे पेरूचे सेवन करावे.

पेरू हिवाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतूत आवडीनं खाल्ला जातो. अनेक गंभीर आजार बरे करण्यासाठी पेरूच्या पानांचा वापर केला जातो. (How to Lower Cholesterol) चवीला उत्तम असणाऱ्या पेरूची पानंसुद्धा फायबर्स, व्हिटामीन ए, व्हिटामीन सी, थियासिन, रायबोफ्लोविन, कॅरोटीन आणि लायकोपिन यांसारख्या एंटी ऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम, फॉस्फरस आणि आयर्नसारख्या पोषक तत्वांनी परीपूर्ण असतात. (Top  lifestyle changes to improve your cholesterol)

एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार पेरूच्या पानांमध्ये  अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. पेरूची पानं कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात ज्यामुळे हृदय निरोगी राहते. एनसीबीआयमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार पेरूच्या पानांचा रस प्यायल्यानं घातक कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते. 

कोलेस्टेरॉल एक घातक पदार्थ आहे ज्यामुळे रक्ताच्या नसा ब्लॉक होतात आणि हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि हृदयाच्या संबंधित आजारांचा धोका कमी होतो. यात पोटॅशियम आणि फायबर्स असात. ज्यामुळे हृदय निरोगी राहते. पेरूच्या पानांचा रस ब्लड प्रेशर कमी करण्यास फायदेशीर ठरतो. 

तज्ज्ञांच्यामते या पानांमध्ये एंटी  ऑक्सिडेंट्स आणि व्हिटामीन्स असतात. ज्यामुळे फ्री रेडिकल्समुळे होणारं नुकसान टाळता येतं. यात पोटॅशियम आणि फायबर्स असतात ज्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. पेरूच्या पानांचा रस ब्लड प्रेशर कमी करून एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते. 

अभ्यासातील सहभागींना ६ आठवडे पेरूच्या पानांचा रस दिला. या कालावधीनंतर त्यांना आढळून आले की त्यांचा रक्तदाब (p<0.05) आणि एकूण कोलेस्टेरॉल ९.९ % कमी झाले आहे. १२० लोकांवर  १२ आठवडे करण्यात आलेल्या एका संशोधनात दिसून आलं की जेवणाआधी पिकलेला पेरू खाल्ल्यानं रुग्णांमधील गुड कोलेस्टेरॉल ८ टक्क्यांनी वाढले होते.  पेरू रक्तातील साखर सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

पोट, मांड्याचा आकार वाढत चाललाय? रोज ३ गोष्टी करा, स्लिम-फिट होण्याचं स्वप्न होईल पूर्ण

पेरूच्या पानांचा रस रक्तातील साखरेची पातळी सुधारतो. तुम्ही डायबिटीसचे रुग्ण असाल तर तुम्ही नियमितपणे पेरूचे सेवन करावे. याशिवाय पेरूची पानं उकळून  हे पाणी गाळून गुळण्या केल्यास दात दुखणंही कमी होतं. पेरूची पानं आरोग्यासाठी उत्तम ठरतात पण कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपाय करा. जेणेकरून अधिकाधिक फायदे मिळवता येतील.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्स