चांगले आरोग्य आणि निरोगी राहण्यासाठी पचनक्रिया व्यवस्थित असणे अत्यंत आवश्यक असते. सध्याच्या या धावपळीच्या बिझी लाईफस्टाइलमुळे आपल्या खाण्या - पिण्याच्या वेळा हमखास चुकतात. बहुतेकवेळा आपण कामाच्या गडबडीत जेवण करायचेच विसरून जातो. कधी कामाच्या घाईत कसेतरी झटपट जेवण उरकतो. योग्य वेळेवर न जेवल्याने किंवा योग्य तो आहार न घेतल्याने त्याचा आपल्या पचनावर अतिशय वाईट परिणाम झालेला दिसून येतो. योग्य वेळेवर जेवण न करणे, नाश्त्याच्या वेळा चुकवणे यांसारख्या सवयी चुकीच्या आहेतच, तसेच या चुकांचा आपल्या पचनशक्तीवर परिणाम होतो( 3 Best Ways to Improve Your Digestion Naturally).
आपल्यापैकी बरेचशा जणांना कामाच्या गडबडीत जेवणाच्या वेळा लक्षात रहात नाहीत. विशेषत: जे दिवसभर ऑफिसमध्ये असतात त्यांना वेळेवर जेवण करणे कठीण होऊ शकते. दुपारच्या जेवणाचा थेट परिणाम पचनक्रियेवर (3 Ways to Naturally Digest Food Faster) होतो. जर आपण दुपारचे जेवण उशिरा घेत असाल तर त्यामुळे गॅस, पोट फुगणे, सुस्ती वाटणे आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. जर आपण दुपारच्या जेवणाच्यावेळी ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण जर कोणत्याही कारणाने आपल्याला दुपारचे जेवण करायला उशीर होत असेल तर पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी आपण या टिप्स फॉलो करू शकता(Tips To Improve Digestion If You Are Not Having Lunch On Time).
दुपारचे जेवण योग्य वेळी घेता आले नाही तर, पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी उपाय...
१. सकाळी ११ ते १ वाजायच्या दरम्यान पाणी प्यावे : - दुपारी ११ ते १ ही दुपारचे जेवण करण्याची योग्य वेळ आहे, असे मानले जाते. परंतु जर आपण या वेळेत दुपारचे जेवण घेऊ शकत नसाल तर या वेळात १ ग्लास पाणी नक्की प्या. या वेळेत पाणी पिण्याने पचनक्रिया सुधारते आणि चयापचय क्रियेचा वेग देखील वाढतो. जर आपण सकाळी नाश्ता लवकर केला असेल आणि जेवायला उशीर होत असेल तर ११ ते १ च्या दरम्यान नक्कीच पाणी प्या. पाणी पिताना घाईघाईत पाणी पिऊ नका, तर आरामात बसून घोट घेत घेत पाणी प्यावे.
मॉर्निंग वॉकला काही खाऊन जावे की उपाशीपोटीच जाणे योग्य ? तज्ज्ञ सांगतात, नक्की योग्य काय...
२. पल्पी म्हणजेच रसदार गर असणारी फळे खा :- कित्येकदा दुपारच्या जेवणाच्या वेळा चुकल्याने आपल्याला पोटाच्या समस्या निर्माण होतात. जर आपण ११ ते १ च्या दरम्यान दुपारचे जेवण घेत नसाल फळं खाण्याला प्राधान्य द्यावे. या वेळात रसदार गर असणारी फळे खावीत. आपण या वेळात पपई, चिकू, केळी यांसारखी फळें खाऊ शकता. यासोबतच आपण फळांशिवाय खजूर देखील खाऊ शकता. यामुळे आपण जेव्हा कधी दुपारचे जेवण कराल तेव्हा गॅस किंवा पोट फुगण्याची समस्या होणार नाही.
वजन कमी करण्यासाठी ४ मंत्र विसरुच नका ! तापसी पन्नूच्या न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवालचा सल्ला...
३. दुपारच्या जेवणानंतर तूप - गूळ खा :- वरील दोन्ही गोष्टी ११ ते १ च्या दरम्यान करून नंतर दुपारी २ ते ३ वाजता जेवण करावे, त्यानंतर तूप आणि गूळ खावे. दुपारच्या जेवणानंतर गुळाचा १ छोटा तुकडा तुपासोबत खावा. यामुळे, दुपारच्या जेवणानंतर आपल्याला गॅस आणि पोटांत अॅसिडिटी किंवा पोट फुगण्याची समस्या जाणवणार नाही.
आपल्या वयानुसार आपण दिवसभरात किती पावले चालावीत ? पहा स्वीडन विद्यापीठाचा अभ्यास काय सांगतो...