Join us   

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फक्त बदाम पुरेसे नाहीत, जीवनशैलीत करा ४ सोपे बदल, मेंदू होईल तेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2023 5:25 PM

Tips to keep your brain healthy : वय वाढलं की स्मरणशक्ती कमकुवत होते असे म्हणतात, पण हे कितपत खरं?

निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करून पाहतो (Healthy Lifestyle). व्यायाम आहाराकडे विशेष लक्ष देतो. पण ब्रेन हेल्थकडे दुर्लक्ष करतो. बऱ्याचदा वय वाढलं की, अनेकांची स्मरणशक्ती कमकुवत होते. बैठी काम, रोजचं रुटीन यामुळे मेंदूला हवी तशी चालना मिळत नाही. अनेकदा आपण बोललेल्या गोष्टी विसरतो, वस्तू विसरतो, यासह लक्ष केंद्रित करण्यासही अडचण निर्माण होते. जर मेंदूला चालना मिळावी, यासह स्मरणशक्ति वाढवायची असेल तर, जीवनशैलीत काही बदल व सकस आहाराचे सेवन करायला हवे (Brain Health). आहाराचा मनावर आणि स्मरणशक्तीवर खोलवर परिणाम होतो.

हार्वर्ड हेल्थनुसार, असे म्हणतात वयानुसार स्मरणशक्ती कमकुवत होते. पण आपण जीवनशैलीत काही बदल करून मेंदूला चालना देता येऊ शकते(Tips to keep your brain healthy).

जीवनशैलीत करा सकारात्मक बदल

स्मरणशक्ती सुधारण्यासाठी जीवनशैलीत काही विशेष बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. यामुळे गंभीर आजारांचा धोका टळतो. शिवाय हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. उदाहरणार्थ, धूम्रपान-मद्यपान सोडा, साखर आणि प्रोसेस्ड फूड खाणंही टाळा.

चहा पिताना तुम्हीपण हमखास ८ चुका करताच, चहाचे शौकीन असाल तर 'या' सवयी टाळा!

मेंदूला चालना देणारे पदार्थ खा

आपल्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करा, ज्यामुळे मेंदूला चालना मिळेल. जसे की, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, चहा, कॉफी, यासह इतर पौष्टीक पदार्थांचा आहारात समावेश करा. पौष्टीक पदार्थ खाल्ल्याने मेंदूला चालना मिळते, शिवाय संपूर्ण आरोग्य सुधारते.

नियमित व्यायाम करा

नियमित व्यायामामुळे मेंदूच्या पेशींच्या वाढीस आणि न्यूरोट्रांसमीटरच्या उत्पादनास प्रोत्साहन मिळते. ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते. यासाठी एरोबिक (कार्डिओ) आणि स्ट्रेन्थ एक्सरसाईज करा.

भरपेट जेवण केल्यानंतरही खाण्याची इच्छा होते? 'असं ' होण्याची ४ कारणं, वेळीच सवय बदला-भुकेवर राहील कण्ट्रोल

झोपही महत्त्वाची

जर आपण पुरेशा प्रमाणात झोप घेत नसाल तर, याचा थेट दुष्परिणाम मेंदूवर होऊ शकतो. शरीराला ८ तासांची झोप हवीच. शिवाय नियमित मेडीटेशन करणं आवश्यक.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य