Join us   

पावसाळ्यात गॅसेस, ब्लोटिंगचा त्रास होतो? पोट खराब होते? आहारात करा ४ छोटे बदल - तब्येतीची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2023 11:37 AM

Tips to prevent gastric problems in monsoon पावसाळ्यात पोटाचा त्रास होऊ नये म्हणून काय खावे काय टाळावे?

पावसाळ्यात पोटाच्या संबंधित त्रास हमखास छळतात. गॅसेस, ब्लोटिंग यामुळे पोट नेहमी फुगलेले राहते. ज्यामुळे अन्न लवकर पचत नाही. पावसाळी वातावरणात आर्द्रता निर्माण होते. ज्यामुळे बॅक्टेरिया लवकर वाढू लागतात. थंड वातावरण असल्यामुळे लोकं बाहेरील फास्ट फूड खाण्यास पसंती दर्शवतात. परंतु, अनहेल्दी फूडमुळे पोटाचा त्रास वाढतो. पावसाळ्यात गॅस, अपचन यापासून सुटका हवी असेल तर कोणते पदार्थ खावे असा प्रश पडतो. यासंदर्भात, न्यूट्रिशन बाय नंदिनीचे फाउंडर पोषणतज्ज्ञ नंदिनी अग्रवाल यांनी, पावसाळ्यात पोटाचा त्रास वाढल्यावर काय खावे व काय टाळावे याची माहिती दिली आहे(Tips to prevent gastric problems in monsoon).

पावसाळ्यात पोट खराब होऊ नये म्हणून काय खावे?

- पपई आणि अननस हे पचनासाठी उत्तम मानले जाते. त्यात ब्रोमेलेन असते, जे एक पाचक एंझाइम आहे. यामुळे गॅस आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

- आलं अन्न पचवण्यासाठी मदत करते. आले आतडे मजबूत करून आपली पचनशक्ती सुधारते. त्यात ब्रोमेलेन पाचक एंझाइम असते. ज्यामुळे पोटाचा त्रास होत नाही. यासाठी जेवणानंतर आलं कोमट पाण्यात उकळून प्या.

सकाळी नाश्त्याला अजिबात खाऊ नका ४ पदार्थ, वजन वाढेल दिवसभर येईल सुस्ती

- जेवणात हळद आणि तूप वापरा. तूप हे हेल्दी फॅट आहे. तुपामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.

- गॅसची समस्या दूर करण्यासाठी हळद फायदेशीर ठरते. हळद पचनासाठीही हलकी असते. जेवणात हळदीचा वापर करा.

- कोमट दुधात हळद मिसळून प्या, यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते.

मॉन्सूनमध्ये पदार्थ खाताना कोणती काळजी घ्यावी?

- पावसाळ्यात ताजी फळे खावी. बाहेरचे उघडे अन्न खाणे टाळावे. त्यामुळे पोटात संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

- पावसाळ्यात अनेकदा तेलकट पदार्थ जास्त खातात. परंतु, तेलकट पदार्थांचा पचनावर परिणाम होतो. त्यामुळे तेलकट पदार्थ खाणे टाळा. यासह थंड पेय पिणे टाळा.

रात्री हळदीचे दूध प्यावे का? कुणी आणि कसे प्यावे?

- घरात बनवलेले अन्न उघडे ठेवू नका. झाकून ठेवा. शिळे अन्न खाणे टाळा. अन्न खाण्यापूर्वी हात चांगले धुवा.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यमोसमी पाऊसपावसाळा आणि पावसाळी आजारपण