Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उष्णता वाढली, जिभेला फोड आले आहेत? ५ घरगुती उपाय- आग आणि फोड होतील कमी

उष्णता वाढली, जिभेला फोड आले आहेत? ५ घरगुती उपाय- आग आणि फोड होतील कमी

Tongue Blisters: 5 Simple And Effective Home Remedies तोंड येण्याचा त्रास उन्हाळ्यात अनेकांना होतो, डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच आहार आणि पचनही सुधारायला हवं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2023 01:31 PM2023-05-19T13:31:43+5:302023-05-19T15:27:57+5:30

Tongue Blisters: 5 Simple And Effective Home Remedies तोंड येण्याचा त्रास उन्हाळ्यात अनेकांना होतो, डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच आहार आणि पचनही सुधारायला हवं.

Tongue Blisters: 5 Simple And Effective Home Remedies | उष्णता वाढली, जिभेला फोड आले आहेत? ५ घरगुती उपाय- आग आणि फोड होतील कमी

उष्णता वाढली, जिभेला फोड आले आहेत? ५ घरगुती उपाय- आग आणि फोड होतील कमी

जीभ हा खूप संवेदनशील भाग आहे. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण विविध पदार्थ खातो. जीभेमुळे आपल्याला चमचमीत, तिखट, गोड, आबंट, कडू, खारट या सर्व चवींचा आस्वाद घेता येतो. जिभेवर कोणती जखम किंवा फोड आली असेल तर, पदार्थांचे चव सोडा, पाणी देखील बेचव लागते. उन्हाळ्यात जिभेवर वारंवार फोड येतात. शरीरातील हिट बाहेर पडते. त्यामुळे जिभेच्या कोपऱ्यांवर लहान - लहान फोड निर्माण होतात.

अशावेळी वेदना तर होतातच पण पाणी पिताना देखील त्याचा दाह सहन करावा लागतो. जिभेवरील हे फोड ७ ते १० दिवसात बरे होतात. पण यावर उपाय म्हणून आपण काही घरगुती उपायांना देखील फॉलो करू शकता. या उपायांमुळे नक्कीच फरक पडेल(Tongue Blisters: 5 Simple And Effective Home Remedies).

मीठ

मिठामुळे जिभेवरील फोड्यांपासून सुटका मिळू शकेल. मिठामध्ये सोडियम क्लोराईड असते, जे जखमेवरील सूज आणि दुखणं कमी करण्यासाठी मदत करते. यासाठी एक कप पाण्यात एक चमचा मीठ घालून मिक्स करा. या मिठाच्या पाण्याने निदान १० मिनिटांसाठी गुळण्या करा. ही प्रक्रिया दिवसातून ४ ते ५ वेळा केल्याने जिभेवरील बॅक्टेरीया निघून जातील.

दही

दही प्रोबायोटिक गुणधर्मांसह दाहक-विरोधी, अँटीबॅक्टेरियल, व अँटीऑक्सिडंट गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. जे वेदना आणि सूज कमी करून अल्सरच्या संबंधित संसर्ग बरे करण्यास मदत करतात. हा उपाय करण्यासाठी दिवसातून एकदा तरी दह्याचे सेवन करा.

२ चमचे सायीचा स्पेशल फेस पॅक, काही मिनिटांत नव्या नवरीसारखा ग्लो येईल चेहरा

लवंगाचे तेल

लवंगाच्या तेलात युजेनॉल नावाचे संयुग असते. जे संसर्गाशी लढण्यास मदत करते. एक कप कोमट पाण्यात लवंग तेलाचे काही थेंब मिसळून गुळण्या करा. यामुळे जिभेवर उठणारे फोड बरे होतील. हा उपाय दिवसातून रोज चार वेळा करा.

खोबरेल तेल

नारळाच्या तेलात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. जे जिभेवरील फोड कमी करण्यास मदत करेल. यासाठी खोबरेल तेल जिभेवरील फोडांवर लावून ठेवा, किंवा गुळण्या करा. यामुळे फोडण्यांमुळे होणारी वेदना कमी होईल.

मान काळी दिसते, हाताचे कोपरे काळवंडले? ३ उपाय - काळेपणा होईल कमी झ्टपट

हळद

हळद सूज आणि दुखणं कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. त्यात अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आढळतात. यात  दाहक-विरोधी घटक, अँटी-ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. जिभेवरील फोडीचा त्रास कमी करण्यासाठी आपण हळदीचा वापर करू शकता. यासाठी हळदीमध्ये मध किंवा दूध मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट जिभेवरील फोडीवर लावा. थोड्या वेळानंतर स्वच्छ पाण्याने गुळण्या करा.

Web Title: Tongue Blisters: 5 Simple And Effective Home Remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.