Join us   

हाडांना पोकळ, सडपातळ बनवते व्हिटामीन B-12ची कमी; रोज हे ५ पदार्थ खा, फिट दिसाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2024 3:44 PM

Top 10 Vitamin B 12 food : व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास  लाल रक्तपेशी कमी होतात, व्हाईट ब्लड सेल्सही कमी होतात. 

व्हिटामीन बी-१२ नं भरपूर १० पदार्थ खाल्ल्यास शरीर निरोगी राहण्यास मदत होते. अन्यथा शरीर एकदम कमकुवत होते.  अनेकांना असं वाटतं की चक्कर येऊन पडायला होईल. व्हिटामीन बी-१२ शरीराच्या नसांसाठी फार आवश्यक असते. व्हिटामीन बी -१२ मुळे लाल रक्ताच्या पेशी तयार होण्यास मदत होते आणि शरीराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात ऑक्सिजन पोहोचतो. परिणामी शरीरात कमकुवतपणा येत नाही. नर्व्हस सिस्टीम चांगली राहते. हे त्रास टाळण्यासाठी व्हिटामीन बी-१२ युक्त पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. फळं, भाज्या व्हिटामीन बी-१२ चा चांगला स्त्रोत आहेत. यात नॅच्युरली काही पदार्थ असतात. (Top 10 Vitamin B 12 food to remove severe vitamin b 12 deficiency symptoms)

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ  हेल्थनुसार कोबालामिन घेण्यासाठी काही पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता.  व्हिटामीन्सची कमतरता पूर्ण  करण्यासाठी पालक, न्युट्रिशनल यीस्ट, दूध, दही, फोर्टीफाईड ब्रेकफास्ट सिरियल्स, चीझ, अंडी. टेम्पेह यांचा समावेश करा. व्हिटामीन बी-१२ ची कमतरता भासल्यास  लाल रक्तपेशी कमी होतात, व्हाईट ब्लड सेल्सही कमी होतात. प्लेटलेट्स कमी होतात. जीभ सुजते. थकवा, कमकुवतपणा जाणवतो, त्वचा पिवळी पडते, डिमेंशिया, अचानक वजन कमी होणं, इसोम्निया हे त्रास उद्भवतात. 

काही पदार्थांच्या सेवनानं व्हिटामीन बी-१२ वाढतं तर काही पदार्थांच्या अतिसेवनानं व्हिटामीन्स कमी होतात. नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थनुसार आपल्या डाएटमधून साखर, सॅच्युरेडेट फॅट, अतिरिक्त सोडीयम, दारू दूर ठेवायला हवी. कारण यामुळे शरीराचे नॉर्मल फंक्शन बिघडते आणि व्हिटामीन्सची कमतरता भासू शकते. व्हिटामीन बी-१२च्या धोकादायक आजारांवर झालेल्या संशोधनात दिसून आले की रक्तात या व्हिटामीन्सच्या कमतरतेमुळे कॅन्सरचा धोका वाढतो. यामुळे हृदयाचे आजार आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.

वरचे दात पिवळे-आतून किड लागली? दात घास १ छोटा बदल करा, मोत्यांसारखे चमकतील दात

जन्मानंतर ६ महिन्यांपर्यंत सर्वांनी ०.४ एमसीजी दैनिक खुराक घ्यायला हवा.  तसंच ७ ते १२ महिन्यापर्यंत ५ एमसीजी,  १ ते ३ वर्षापर्यंत ०.९ एमसीजी, ४ ते ८ वर्षांपर्यंत १.८ एमसीजी, ९ ते १३ वर्ष १.८ एमसीजी आणि १४ वर्षांनंतर पुरूष आणि महिलांनी  २.४ एमसीजी व्हिटामीन  बी-१२ घ्यायला हवे. 

टॅग्स : हेल्थ टिप्सफिटनेस टिप्स