Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रोज चमचाभर खा ‘हे’ ४ पदार्थ; कुरकुणारी हाडं होतील बळकट- कॅल्शियम भरपूर-पचनही सोपं

रोज चमचाभर खा ‘हे’ ४ पदार्थ; कुरकुणारी हाडं होतील बळकट- कॅल्शियम भरपूर-पचनही सोपं

Top 4 Calcium-Rich Foods (Many Are Nondairy) : दूध, दही आणि पनीरच नव्हे तर, 'या' ४ पदार्थातून मिळेल भरपूर कॅल्शियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2024 05:32 PM2024-06-07T17:32:44+5:302024-06-07T17:33:25+5:30

Top 4 Calcium-Rich Foods (Many Are Nondairy) : दूध, दही आणि पनीरच नव्हे तर, 'या' ४ पदार्थातून मिळेल भरपूर कॅल्शियम

Top 4 Calcium-Rich Foods (Many Are Nondairy) | रोज चमचाभर खा ‘हे’ ४ पदार्थ; कुरकुणारी हाडं होतील बळकट- कॅल्शियम भरपूर-पचनही सोपं

रोज चमचाभर खा ‘हे’ ४ पदार्थ; कुरकुणारी हाडं होतील बळकट- कॅल्शियम भरपूर-पचनही सोपं

हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम आवश्यक (Calcium rich foods). शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडं आणि दात कमकुवत होतात. कॅल्शियममुळे हाडांना मजबुती मिळते (Bones health). शिवाय ऑस्टियोपोरोसिस सारख्या हाडांशी संबंधित रोग टाळण्यास मदत करते. कॅल्शियम रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यासाठी देखील कार्य करते (Health care).

जेव्हा शरीरात कॅल्शियमची कमतरता असते, तेव्हा आपले शरीर कमकुवत होते. शिवाय हाडं ठिसूळ, थकवा, कोरडी त्वचा, निद्रानाश आणि चिडचिड यांसारखी लक्षणे दिसू शकतात. यासाठी आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करायला हवा.

दूध, दही आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. पण काहींना दुग्धजन्य पदार्थ आवडत नाही. अशावेळी आपण दुग्धजन्य पदार्थ व्यतिरिक्त नट्स आणि बियांचा आहारात समावेश करू शकता. यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून निघेल, शिवाय शरीराला ताकद मिळेल(Top 4 Calcium-Rich Foods (Many Are Nondairy)).

कॅल्शियमने परिपूर्ण ४ पदार्थ

चिया सीड्स

चिया सीड्स हे पौष्टिकतेचे छोटे पॉवरहाऊस मानले जाते. ज्यामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्, फायबर आणि प्रथिनांसह उच्च कॅल्शियम आढळते. आपण चिया सीड्सचा वापर अनेक पदार्थांमध्येही करू शकता. १०० ग्रॅम चिया बियांमध्ये सुमारे ६३१ मिलीग्राम कॅल्शियम असते. चिया सीड्स खाण्याचे इतरही काही आरोग्यदायी फायदे आहेत.

मुलं स्वत:हून अभ्यासालाच बसत नाहीत? आईबाबा, करा फक्त ४ गोष्टी- न सांगता मुलं करतील अभ्यास

पांढरे तीळ

पांढरे तीळ हे कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. ते अनेक पदार्थांची चव आणि पोषण वाढविण्यासाठी वापरले जातात. १०० ग्रॅम तिळात अंदाजे ९७५ मिलीग्राम कॅल्शियम असते. याशिवाय यात मॅग्नेशियम, लोह आणि निरोगी चरबी देखील आढळते.

खसखस

आकाराने लहान खसखस खाण्याचे अनेक फायदे आहेत. १०० ग्रॅम खसखस ​​बियांमध्ये अंदाजे १४३८ मिलीग्राम कॅल्शियम असते. कॅल्शियम व्यतिरिक्त, खसखस ​​फायबर, मँगनीज आणि फॅटी ऍसिडस या पोषक घटकांनी परिपूर्ण आहे. जे हाडांचे आरोग्य आणि पचनक्रिया सुधारतात.

FSSAI म्हणते भेसळयुक्त कूकिंग ऑइल खाणं टाळा; गंभीर आजारांचा धोका वाढेल - सारखं आजारी पडाल

ब्राझील नट्स

१०० ग्रॅम ब्राझील नट्समध्ये कॅल्शियमचे प्रमाण अंदाजे १६० मिलीग्रॅम असते. ब्राझील नट्स देखील सेलेनियमचा एक चांगला स्रोत आहेत. याशिवाय रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास आणि अँटिऑक्सिडंट्सचा एक चांगला स्रोत देखील आहे. 

Web Title: Top 4 Calcium-Rich Foods (Many Are Nondairy)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.