पाणी (Water Intake) शरीरासाठी फायदेशीर ठरते. काही दिवसात उन्हाळा सुरु होईल. या दिवसात शरीर डिहायड्रेट होते. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यासाठी पाणी मदत करते. ज्यामुळे पोटही साफ होते. पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. पण पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? शिवाय पाणी कधी प्यावे कधी पिऊ नये याची माहिती बहुतांश जणांना ठाऊक नाही.
काही लोकं जेवण करताना मध्येच पाणी पितात (Health Tips). तर काही लोकं दिवसभरात ३ ते ४ ग्लासांवर अधिक पाणी पीत नाही. पाणी पिण्याचे जितके फायदे आहेत, तितकेच अयोग्य वेळी पिण्याचे तोटे देखील आहेत (Drinking Water). पाणी पिण्याचे फायदे आरोग्याला मिळावे यासाठी कधी पाणी प्यावे याची माहिती आयुर्वेदिक एक्स्पर्ट दीक्षा भावसर यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहे(Top 5 Best Times to Drink Water In a Day).
कोणती क्रिया करण्याआधी पाणी प्यावे
सकाळी उठताच पाणी प्या
डॉक्टर दीक्षा भावसरच्या मते, 'शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी सकाळी पाणी पिणे गरजेचं आहे. रात्री जेवल्यानंतर आपण सकाळी नाश्ता करतो. त्यामुळे सकाळची सुरुवात नेहमी एक ग्लास पाण्याने करा. आपण रात्रभर काहीच खात नाही, ज्यामुळे आपला उपवास होतो. त्यामुळे सकाळी पाणी किंवा कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या.
जिम-डाएट करूनही वजन घटत नाही? मग कोमट पाण्यात मिसळा एक रस-मिळतील फायदेच फायदे
जेवण करण्यापूर्वी पाणी प्या
जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट साफ होण्यास मदत होते. ज्यामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचते, शिवाय वजन कमी करण्यास मदत होते. अभ्यासानुसार, 'जेवणाच्या ३० मिनिटापूर्वी आणि दिवसभरात ५०० मिलीलीटर पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. नियमित १२ आठवडे हा नियम फॉलो केल्याने वजन कमी होण्याचा वेग वाढतो.
झोपण्यापूर्वी पाणी पिणे आवश्यक
झोपण्यापूर्वी पाणी प्याल्याने ब्लड सर्क्युलेशन सुधारते. जर आपल्याला हृदयाच्या निगडीत समस्या आहे, किंवा ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर, शरीर हायड्रेट ठेवा. पाणी पीत राहा. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. यासह पोटाचे विकारही दूर होतात.
बाहेरचं चमचमीत खाऊनही वजन वाढणार नाही! फॉलो करा ४-३-२-१ चा वेट लॉस रूल
आंघोळीपूर्वी पाणी प्या
एक ग्लास कोमट पाणी ब्लड प्रेशर लेव्हल कमी करण्यास मदत करते. आपण आंघोळ करण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाणी पिऊ शकता. यामुळे रक्ताभिसरण प्रणालीचा विस्तार होईल, ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशनमध्ये कोणतीही अडचण येत नाही.
एक्सरसाईज करण्यापूर्वी पाणी पिणे गरजेचं
एक्सरसाईज केल्यानंतर आणि करण्यापूर्वी पाणी पिणे गरजेचं आहे. पाणी शरीराला उर्जा प्रदान करते. ज्यामुळे व्यायाम करताना कोणतीही अडचण निर्माण होत नाही. आपण एक्सरसाईज करण्यापूर्वी, केल्यानंतर आणि करतानाही पाणी पिऊ शकता.