हिवाळ्यात हाडांच्या समस्या (Bone Health) वाढत जातात. सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी यामुळे प्रत्येक जण त्रस्त आहे. शिवाय तरुणाई देखील हाडांच्या दुखण्यापासून त्रस्त आहे. हाडांच्या उत्तम आरोग्यासाठी आहारातून कॅल्शियम मिळणं गरजेचं आहे. हाडं मजबूत राहावी यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे. कॅल्शियमसाठी काही लोकं दुग्धजन्य पदार्थ खातात (Health Tips). पण फक्त दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्याने हाडांना पुरेसं कॅल्शियम मिळेल असे नाही(Top 5 Calcium-Rich Foods Many Are Nondairy).
यासंदर्भात, न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी हाडांच्या बळकटीसाठी फक्त दुग्धजन्य पदार्थ नसून, इतर नॉन-डेअरी प्रॉडक्ट्स देखील खायला हवे. इतर काही पदार्थांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कॅल्शियमचे प्रमाण असते. त्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी कोणते पदार्थ उपयुक्त ठरतील पाहूयात.
गाजर आणि पालक
अंजली मुखर्जी यांच्या मते, '६ मध्यम आकाराचे गाजर आणि ५० ग्रॅम पालकाच्या ज्यूसमध्ये ३०० मिलीग्राम कॅल्शियम असते. २०० मिली गाईच्या दुधात फक्त २४० मिलीग्राम कॅल्शियम असते. गाजर पालकाचा रस पिऊनही आपण निरोगी राहू शकता.
वाढत्या वयामुळे विसराळूपणा वाढत चाललाय? रोज खा ५ पैकी एक गोष्ट-स्मरणशक्ती वाढेल, राहाल फिट
बिन्स
राजमा, चणे, मसूर किंवा हरभरा इत्यादी कडधान्यांमध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते. १०० ग्रॅम डाळीमध्ये २०० ग्रॅम कॅल्शियम असते. आपण नियमित कडधान्यांचे सेवन करू शकता. यामुळे आरोग्याला कॅल्शियम तर मिळेल, शिवाय इतरही पौष्टीक घटक मिळतील.
पांढरे-काळे तीळ
हिवाळ्यात तिळाचा वापर हमखास होतो. हाडांच्या बळकटीसाठी पांढरे आणि काळे तीळ मदत करते. यामध्ये भरपूर कॅल्शियम असते. सुमारे १०० ग्रॅम तिळात १४० मिलीग्राम कॅल्शियम असते. आपण दररोज आपल्या आहारात तिळाचा समावेश करू शकता.
गायीचं की म्हशीचं? हाडांच्या बळकटीसाठी कोणतं दूध चांगलं? कॅल्शियम कशातून जास्त मिळते?
इतर पालेभाज्या
यासोबतच, ब्रोकोली, भेंडी, सोयाबीन इत्यादी हिरव्या पालेभाज्यांमध्येही कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. शिवाय इतर घटकांनी परिपूर्ण असतात.