Join us   

टाईप २ डायबिटीज कंट्रोल करणाऱ्या ५ गोष्टी, तज्ज्ञ सांगतात प्लांट बेस डाएटचे नवे निष्कर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2022 7:36 PM

How To Control Diabetes Type 2: रोजच्या जीवनशैलीत काही बदल केले तर टाईप २ डायबिटीज नक्कीच कंट्रोल करता येतो... त्यासाठीच तर वाचा तज्ज्ञांचा सल्ला.

ठळक मुद्दे टाईप २ डायबिटीज असेल तर डाॅक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार वेळेत कराच, पण या सगळ्या गोष्टींकडेही लक्ष द्या, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. 

एकदा का मधुमेहाचा त्रास सुरु झाला की मग तो आयुष्यभर तुमची सोबत करतो. तो आजार आपण पुर्णपणे नष्ट तर करु शकत नाही. पण काही पथ्ये पाळली आणि गोळ्या औषधी वेळेवर घेतले तर मात्र डायबिटीज कंट्रोल करणे शक्य आहे. जगभरातच हा आजार प्रचंड वाढलेला आहे. भारतात तर दर दोन घरांपैकी एका घरात डायबेटीज असणारे रुग्ण अगदी सहज दिसून येतात. यातही टाईप १ पेक्षा टाईप २ मधुमेहाचे (type 2 diabetes) रुग्ण अधिक असतात. भारतात एकुण मधुमेही रुग्णांमध्ये ९० टक्के रुग्ण हे टाईप २ डायबिटीज असणारे आहेत. 

 

टाईप २ प्रकारात शरीरात इन्सुलिन निर्मितीला (insulin secretion) अडथळा येतो. पण आहारात काही बदल केला तर मात्र  शरीरात इन्सुलिन निर्मिती योग्य प्रमाणात होऊन मधुमेह  नियंत्रणात ठेवता येऊ शकतो, अशी  माहिती गगन  धवन यांनी एचटी लाईफस्टाईलशी बोलताना दिली. त्यामुळेच तर टाईप २ डायबिटीज असेल तर डाॅक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार वेळेत कराच, पण या सगळ्या गोष्टींकडेही लक्ष द्या, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. 

 

टाईप २ डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यासाठी.... १. हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या आहारातील साखरेला रक्तामध्ये मिसळण्यापासून रोखतात. त्यामुळे रक्तातील साखरेचे संतुलन योग्य प्रमाणात राखले जाण्यास मदत होते. त्यामुळे आहारात नेहमीच जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या खाव्या. त्यातही तुम्ही सॅलाड स्वरुपात कच्च्या भाज्या खाल्ल्या तर त्यातून तुम्हाला भरपूर प्रमाणात ॲण्टी ऑक्सिडंट्स मिळतात आणि रक्तामध्ये अचानक साखरेचे प्रमाण वाढण्याचे प्रकार त्यामुळे पुर्णपणे कंट्रोलमध्ये येतात. 

 

२. दुग्धजन्य पदार्थ शरीरातील artery-clogging saturated fats आणि कोलेस्टरॉल वाढण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ मदत करतात. त्यामुळे डायबिटीज टाईप २ असणाऱ्या लोकांसाठी दुग्धजन्य पदार्थांचे कमीतकमी सेवन किंवा मग ते पदार्थ पुर्णपणे टाळणे फायद्याचे ठरते.

 

३. व्हिटॅमिन डी मशरूम, टोफू, सोया मिल्क असे व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असणारे पदार्थ रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे असे पदार्थ आवर्जून आहारात असावेत. या पदार्थांचा दुसरा एक फायदा म्हणजे शरीरात इन्सुलिन स्त्रवण्याची पातळी वाढण्यास ते मदत करतात.

 

४. हे पदार्थ टाळा डायबिटीज असणाऱ्या लोकांनी चहा, काॅफी असे पदार्थ घेणे पुर्णपणे टाळले पाहिजे. हे पदार्थ बिना साखरेचे किंवा कमी साखरेचे घेतले तरी त्यातून दुग्धजन्य पदार्थ पोटात जातात. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यासाठी ते कारणीभूत ठरतात. यासोबतच बाजारात मिळणारे कोणतेही रेडिमेड ड्रिंक्स घेणे टाळले पाहिजे. त्याऐवजी ऊसाचा रस, फळांचा रस असे नैसर्गिक पेय घ्यावेत.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समधुमेहअन्न