Join us   

कमी खर्चात प्रोटीन हवंय? भरपूर प्रोटीन असलेले ५ स्वस्त पदार्थ खा; तिशीतही दिसाल तरुण आणि फ्रेश कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 10:46 AM

Top 5 Food For Calcium And Protein (Protein sathi kay khave) : प्रोटीन्स, कॅल्शियम, आयर्न आणि व्हिटामीन्स, मिनरल्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करण्याची आवश्यकता असते.

अनेकांचा असा समज असतो की फक्त मांसाहार केल्याने शरीराला पोषक घटक मिळतात. (Health Tips) पण काही व्हेज पदार्थांचा आहारात समावेश केल्यास शरीराला पोषक तत्व ही मिळतील आणि वाढत्या वयातही तुम्ही तरूण दिसाल. (Food Sources Of Calcium  For Your Bones) वयाची तिशी ओलांडल्यानंतर  शरीर कमकुवत होऊ लागते आणि डायबिटीज, बीपी यांसारख्या गंभीर शारीरिक समस्या उद्भवतात. यासाठी हेल्दी आणि फिट राहणं गरजेचं असं.

सुरूवातीपासून प्रोटीन्स, कॅल्शियम, आयर्न आणि व्हिटामीन्स, मिनरल्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करण्याची आवश्यकता असते. (Protein Calcium And Omega3 Acid Rich Veg Foods) ऑस्ट्रेलियन आहाराच्या मार्गदर्शकानुसार संतुलित आहारासाठी प्रथिनेयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रोटीन्स शेक, पावडर आणि सप्लिमेंट्सचा आहारात समावेश करू शकता. 

३० ओलांडल्यानंतर उद्भवणारे त्रास टाळण्यासाठी कॅल्शियम, व्हिटामीन डी युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. दूध, दही, पनीर, बदाम असे कॅल्शियमयुक्त पदार्थ खा. भरपूर भाज्यांचे सेवन करा.  फ्री रेडिकल्स तरूण दिसण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पेशी इतर घटकांचे काम  कमी करतात.  यासाठी एंटीऑक्सिडेंट्सयुक्त  खाद्य  पदार्थ जसं की ब्लॅक टी, कॉफी,  बेरीज, ब्यू बेरी, ब्राऊन राईस अशा पदार्थांचा आहारात समावेश करा.

अंगदुखी-अशक्तपणा-कॅल्शियम कमी झालं? रामदेव बाबा सांगतात ५ उपाय, हाडं होतील बळकट

चांगली झोप येईल अशा पदार्थांचा आहारात समावेश 

असे  खाद्यपदार्थ खा ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल. चांगल्या आरोग्यासाठी झोप पूर्ण होणं महत्वाचं असतं. रात्री झोपण्याच्या आधी बदामाचे दूध घ्या, बदाम, अक्रोड यांसारख्या हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करा. 

बीपी कंट्रोलमध्ये ठेवा

वाढत्या वयात हाय बीपी होण्याचा धोका नेहमी असतो यामुळे अनेक गंभीर आजारही उद्भवू शकतात. अशा पदार्थांचा आहारात समावेश करा ज्यात पोटॅशियम असते जसं की  बटाटा, बीन्स आणि टोमॅटो.

मनगट बारीक पण दंडांची चरबी वाढलीये? १० मिनिटांचे २ व्यायाम, फॅट होईल कमी-टोन होतील हात

फायबर्स

फायबर्स पचण्यासाठी फार आवश्यक असते. यामुळे पचनाशी संबंधित समस्याही उद्भवत नाहीत. म्हणूनच आपल्या आहारात फळं, भाज्या अशा पदार्थांचा समावेश करा.

ओमेगा -३ फॅटी एसिड्स

ओमेगा-३ फॅटी एसिड्स हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तसंच हृदयविकाराचा धोका कमी करते. म्हणूनच आपल्या आहारात चिया सिड्स, हेम्प सिड्सचा समावेश करा. 

प्रोटिन्स फूड

प्रोटीन्स मसल्स ग्रोथ आणि रिपेअर करण्यासाठीग्रीक योगर्ट, डाळी, बीन्स, चिया सिड्स,  क्विनोआ, कॉटेज चिझ, चणे आणि सिड्सचा आहारात समावेश करा. 

टॅग्स : हेल्थ टिप्सफिटनेस टिप्सआरोग्य