आजकाल कमी हिमोग्लोबिन आणि आयर्नच्या कमतरता एक खूपच कॉमन समस्या बनली आहे. (Health Tips) ज्या लोकांमध्ये हॉर्मोनल असंतलुन, इन्फर्टिलीटी, लठ्ठपणा, गॅस, मूळव्याध, इरिटेबल बाऊल सिंड्रोम यांसारखे आजार असतात (Foods For Iron Deficiency) त्यांच्यात हिमोग्लोबिनचा स्तर कमी असतो. (Top 5 Foods For Iron Deficiency) आयर्नची कमतरता भासल्यास अनेक गंभीर समस्याही उद्भवू शकतात. (How To Increase Iron)
आयर्नच्या कमतरतेमुळे काही सामान्य लक्षणं जसं की थकवा येणं, कमकुवतपणा, श्वास घ्यायला त्रास होणं, त्वचा पिवळी पडणं ही लक्षणं जाणववतात. तुम्हाला या पैकी कोणतीही लक्षणं जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करा. रक्त वाढवण्यासाठी आयुर्वेदीक डॉक्टर चैताली राठोड यांनी काही आयुर्वेदीक उपाय सांगितले आहेत. (Iron Difficiency Solution)
1) आवळा आणि मध
आवळा व्हिटामीन सी आणि आयर्नचा उत्तम स्त्रोत आहे. ज्याच्या शरीरात हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी रोज आवळ्याच सेवन करायला हवे. ज्यामुळे लाल रक्त पेशी वाढण्यास मदत होते. सकाळी आवळा आणि मधाच्या मिश्रणाचा आहारात समावेश करा.
2) मेथीच्या दाण्यांचे पाणी
रात्रभर पाण्यात मेथीचे दाणे भिजवून ठेवा. सकाळी या मेथी दाणे शिजवून सकाळी मेथीचे दाणे शिजवून भाताबरोबर खा. यामुळे लाल रक्त पेशींची उत्पादन वाढते. याशिवाय तुम्ही पाण्याचा वापर स्वंयपाक करताना करू शकता किंवा गाळून हे पाणी प्या.
3) पालक
पालकात फॉलेट, व्हिटामीन सी आणि रक्त वाढवणारे गुण असतात. पालकाचे सेवन केल्यानं शरीरा निरोगी राहण्यास मदत होते. याशिवाय तब्येतीच्या गंभीर समस्याही उद्भवत नाहीत. पालक लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी फायदेशीर ठरते. पालक सॅण्डविच, पालक पकोडा किंवा भाजीतही तुम्ही पालक खाऊ शकता.
4) अक्रोड
अक्रोडमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, आयर्न, कॉपर, ओमेगा-3 फॅटी एसिड्स, मोनोअसॅच्युरेडेट फॅटी एसिड्स, फॉस्फरस, सेलेनियम आणि जिंक असते. याशिवाय हिमोग्लोबिन वाढण्याही मदत होते. हे पाचही पदार्थ आयर्नने परिपूर्ण असतात. शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी मदत करतात.
5) भोपळ्याच्या बिया
नाश्त्याला भोपळ्याच्या बीया खाल्ल्याने लाल रक्त पेशींची उत्पादन वाढते. या तिन्ही बिया योग्य प्रमाणात मिसळून १ चमचा याचे सेवन करा. हे सर्व उपाय तुम्ही करू शकता. पण जर तुम्हाला वाताची समस्या असेल तर आवला खाणं टाळा. ज्या लोकांची शुगर लेव्हल कमी असते. त्यांनी मेथीचे सेवन करू नये. दिर्घकाळ आयर्नची कमतरता भासल्यास आयुर्वेदीक डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.